निवड / नियुक्ती / सुयश

प्रा. मंजुषा सागर यांना राष्ट्रीय प्रतिष्ठा पुरस्कार २०२३ जाहीर.

Spread the love

.ग्यानीवंत गेडाम
वरोरा -द ट्रायबल पोस्ट मीडिया यवतमाळ चीफ ब्युरो व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या यवतमाळ जिल्ह्याच्या कार्याध्यक्ष व चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख प्राचार्य मंजुषा दौलतराव सागर यांना हा पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे उच्च विद्या विभूषित असलेल्या मंजुषा सागर यांनी आकाशवाणी मध्ये अनेक वर्ष सेवा केली असून त्यांच्या सामाजिक व पत्रकारिता कार्याची दखल घेत नुकतीच त्यांची अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख रवींद्र तिराणीक यांनी राष्ट्रीय स्तरावरील वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक्स मीडिया यवतमाळ जिल्हा ट्रायबल पोस्ट मीडिया या पदावर त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्याच्या अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या कार्यकारणी मध्ये जिल्हा कार्याध्यक्ष व चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती केली हे विशेष.

राष्ट्रीय प्रतिष्ठा पुरस्कार 2023 हे भारतातील सर्व प्रांतातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना गौरविण्यासाठी देण्यात येतो यावर्षी समाजकार्य या क्षेत्रातील कार्यासाठी मंजुषा दौलतराव सागर यांना हा पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.
राष्ट्रीय प्रतिष्ठा पुरस्कारासाठी वर दी वेलनेस फाउंडेशन तर्फे प्रस्ताव मागविण्यात आले होते. शिक्षण संस्था कॉन्व्हेंट चालविणाऱ्या मंजुषा सागर या स्वतः वडकी या गावात आदिवासीबहुल भागात शिक्षण देण्याचे कार्य गेल्या 23 वर्षापासून सातत्याने करीत आहे. त्याच्या स्मॉल वंडर्स हायस्कूल व कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात निराधार व पालक नसणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे. अनाथ आश्रम सुरू करण्याचा त्याचा मानस असून समाज हिताच्या मानव कल्याण कार्याची दखल घेत त्यांना राष्ट्रीय प्रतिष्ठा पुरस्कार 2023 जाहीर करण्यात आला आहे. मंजुषा सागर या नागपूरच्या रहिवासी असून उच्चशिक्षित आहे. वडकी या गावात कार्य करीत असून आजचा स्थितीत 13 ते 17 च्या आसपासच्या गावातील विद्यार्थ्यांना त्यांचा लाभ होत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close