भाजपा जेष्ठ नेते यांनी केले शाहिदांना अभिवादन
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
गुरुवारी शहीद दिनानिमित्त अमर शहीद भगतसिंग चौक येथे मंडळाचे संस्थापक अरुणभाऊ अडसड यांच्या हस्ते शहीद भगतसिंगांना हारार्पण व अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला याप्रसंगी शेकडो युवकांनी आपल्या ह्रदय स्थानी असलेल्या व मातृभूमी करिता फासावर चढलेल्या हुतात्मा भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना अभिवादन केले
यावेळी मंडळाचे कार्यकर्ते व शहरातील शेकडो नागरिक उपस्थित होते
त्याग आणि समर्पणातून राज्यात सर्व प्रथम स्थापित शहीद भगतसिंग यांच्या मूर्तीला मंडळाचे शेकडो कार्यकर्ते केवळ शहीद दिन आणि जन्मदिवसालाच नव्हे तर दैनंदिन ईश्वर रूपाने नतमस्तक होतात हे येथे उल्लेखनीय
राष्ट्रभक्ती मय वातावरणात आयोजित उपरोक्त प्रसंगी संपूर्ण अमर शहीद भगतसिंग चौकाला सजविण्यात आले
आमदार प्रताप अडसड यांच्या निधी मधून करण्यात आलेल्या सौंदर्यीकरणाने प्रकाशमय झालेले अमर शहीद भगतसिंग चौक लखलखित झाले आहे