बोळधा ग्रामपंचायत भ्रष्टाचाराच्या विळाख्यात..
लाखो रुपयांची अफरातफर . तक्रार दाखल चौकशी मात्र होईना…?
मार्च महिन्यात हिशोब कस देणार जनतेला प्रश्न
चिमूर ता, प्र, ज्ञानेश्वर जुमनाके
चिमूर तालुक्यातील बोळधा ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक ढोले व सरपंच यांच्या सहमताने लाखो रुपये पैशाचे अफरातफर झाली असून त्याची तक्रार ग्रामपंचायत बोळधा चे उपसरपंच सदाशिव घोनमोडे यांनी सर्वांग विकास अधिकारी यांच्याकडे 24- 11- 2022 ला तक्रार दाखल केली आहे, परंतु चार महिने लोटून सुद्धा कुठलीही कारवाही सरपंच, सचिव यांच्यावर झाली नाही, त्यामुळे संबंधित अधिकारी हे ग्रामसेवक व सरपंच यांना वाचविण्याचा प्रयत्न तर करीत नाही ना अशी शंका निर्माण झाली आहे.
कोरोना काळात प्राप्त झालेल्या बत्तीस हजार पाचशे रुपये शासकीय निधीची अफरातफर सचिव आणि सरपंच यांनी केली असून, पिण्याच्या पाण्याच्या साठ कॅन 40 रुपये प्रति नगा प्रमाणे म्हणजेच वीस हजार रुपये किमतीला विक्री केल्या परंतु 20000 रुपये ची नोंद ग्रामपंचायतच्या कुठल्याही खात्यामध्ये जमा न करता या रकमेची अफरातफर सरपंच सचिव यांनी केली त्याचबरोबर ग्रामपंचायत मध्ये असलेल्या भंगार याची विक्री च्या माध्यमातून अंदाजे पंचवीस हजार रुपये प्राप्त झाले मात्र त्याची सुद्धा नोंद ग्रामपंचायत रेकॉर्ड नसून हे रक्कम सुद्धा हडप करण्यात आली आहे. लाखो रुपयाच्या पैशाचा अफरातपर केलेल्या सरपंच व सचिव यांच्या विरोधात बोळधा ग्रामपंचायत चे उपसरपंच सदाशिव घोनमोडे यांनी तक्रार दाखल केली मात्र त्यांच्या तक्रारीची दखल घेतली गेली नसून एक प्रकारे भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचा हा एक प्रकार आहे यातील तीळ मात्र शंका नाही. तक्रार दाखल करून सुद्धा चौकशी होत नसेल तर होणाऱ्या भ्रष्टाचारा विरोधात लढणे बंद करायचे काय…? हा प्रश्न निर्माण होत आहे