राजकिय

मौदा येथे रविवारी शिवसेनेचा मेळावा

Spread the love
वार्ताहर / मौदा
मौदा तालुक्यातील शिवसेना पक्ष बळकट व कार्यकर्त्यांनी पक्षवाढीसाठी विशेष प्रयत्न करावे. तर राज्यात शिंदेचे सरकार असून, राज्यातील गावागावात शिवसेना शाखा व घर तिथे शिवसैनिक संघटन मजबूत करणे. सरकारच्या योजना गावागावापर्यंत पोहोचवणे, यासाठी शिवसेना पक्ष मजबूत करण्यासाठी आतापासून कार्यकत्यांनी कामाला लागावे. यासाठी शुक्रवार, १७ मार्च रोजी मौदा येथे रविवार, १९ मार्चला होणाऱ्या शिवसेना मेळाव्यानिमित्त प्रेम बैठक तालुका प्रमुख नितेश वांगे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. मौदा येथे शिवसेनेचा मेळावा धनजोडे सभागृह येथे सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आला. यात प्रमुख उपस्थित म्हणून रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाने, रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष जयस्वाल, जिल्हाप्रमुख शिवसेना संदीप इटकेलवार, उपजिल्हाप्रमुख राजनसिंग वधार्राज पिल्ले, जि. प सदस्य संजय झाडे, तालुका प्रमुख नितेश वांगे, प्रशांत भुरे, नंदा लोहबरे, मनोज कुठे, रक्षा थोटे, महेश मोटघरे, ज्ञानेश्वर चौरे, भुमेश्वर चापले, महेश मोटघरे, ज्ञानेश्वर चौरे, महेंद्र चकोले, मनोज गहेरवार, जयपाल जौंजाळकर, उत्तम मेश्राम आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला जास्तीत जास्त महिला- पुरुष, युवा कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका प्रमुख नितेश वांगी यांनी केले आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close