निवड / नियुक्ती / सुयश

से.फ.ला. हायस्कूलचे कलाशिक्षक अजय जिरापुरे उपक्रमशील कला शिक्षक म्हणून सन्मानित…

Spread the love

 

धामणगाव रेल्वे – तालुका प्रतिनिधी

विदर्भ कलाशिक्षक संघ, जिल्हा संघ अमरावतीचे वतीने जिल्हास्तरीय चित्र रंगभरण स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त विद्यार्थी व कलाक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कला शिक्षकांना, कलावंतांना सन्मानित करण्यात आले. सदर सोहळ्यास, शिक्षण उपसंचालक शिवलिंग पटवे, शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कचवे,श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीपबाबु इंगोले,प्राचार्य मनिषी दाभाडे मुख्याध्यापक संघाचे प्रविण दिवे ,रवींद्र कोकाटे,व्यंगचित्रकार प्रदीप बाजड आदींची उपस्थिती होती सदर सोहळा अत्यंत देखणा झाला..*
*विद्यार्थ्यांची कल्पकता व सुर्जनशीलता वृद्धिंगत होण्यासाठी धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित से.फ.ला. हायस्कूल, धामणगाव रेल्वे जिल्हा – अमरावतीचे कलाशिक्षक अजय जिरापुरे यांनी विद्यार्थ्यांसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांना देत असलेल्या प्रोत्साहन व मार्गदर्शनाबद्दल, नाविन्यपूर्ण कलेचे उपक्रमाबद्दल उपक्रमशील कलाशिक्षक म्हणून गौरवचिन्ह व सन्मानपत्र देऊन विनोदभाऊ इंगोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.. तसेच विदर्भ कला शिक्षक संघ जिल्हा शाखा अमरावतीचे वतीने विद्यार्थ्यांसाठी आयोजित चित्ररंगभरण स्पर्धेची चित्रे अत्यंत सुंदर व प्रमाणबद्ध रेखाटन केल्याबद्दल सन्मानचिन्ह, शाल देऊन प्रफुलजी कचवे शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद, अमरावती यांच्या हस्ते गौरवांकीत करण्यात आले.. नुकताच हा कार्यक्रम सोहळा विमलाबाई देशमुख सभागृह पंचवटी, अमरावती येथे संपन्न झाला*
*कलाशिक्षक अजय जिरापुरे यांना मिळालेल्या सन्मानाबद्दल विद्यालयाचे गणेश चांडक, उपप्रचार्य प्रशांत शेंडे, पर्यवेक्षक गोपाल मुंधडा तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे…*

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close