नेर प्रतिनिधी / नवनाथ दरोई
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नेर येथील निर्मल बन्सी लॉन येथे, महिला व बालकल्याण विभाग व नेर नगर परिषदेच्या वतीने, महिलातील सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी महिलांसाठी संगीत खुर्ची, दोरीवरच्या उड्या, नेमबाजी, चमचा लिंबू , फुगे फुगविने, समूह नृत्य व सासु सुनेतील कला अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या शुभहस्ते राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, लता मंगेशकर च्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. स्त्रियांना जागृत करण्याचे मोलाचे काम सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई, राष्ट्रमाता जिजाऊ या कर्तबगार स्त्रियांच्या नेत्रदीपक योगदानामुळे स्त्रियांना लढण्याचे व आत्मविश्वासाने जगण्याचा मान दिला. त्यामुळे स्त्रिया आज अत्यंत यशस्वीपणे स्वकर्तुत्वाने घर सांभाळत आहे. अशी दुहेरी भूमिका ते यशस्वीपणे सांभाळत आहे. त्यामुळे भारत प्रगतीपथावर घोडदौड करत आहे. स्त्री सक्षम असली तर समाजाची नैतिकता कायम राहू शकते,असे मत,सिने अभिनेत्री वर्षा उगावकर यांनी जागतिक महिला दिनी व्यक्त केले. उसगावकर पुढे अशा म्हणाल्या की, महिला दिनाचे महत्त्व गेल्या दहा वर्षापासून वाढले. महिला दिन हा महिला उत्सव दिन म्हणून साजरा करवा. या उत्सवामुळे महिलांचे शशक्तीकरण झाले.परंतु महिला बालकल्याण व नेर नगरपरिषदेने घेतलेल्या उत्सवामध्ये सभा मंडपात तीन हजाराच्या वर महिला उपस्थित होत्या, उपस्थित महिलांमध्ये डॉक्टर,वकील, मुख्याध्यापक, प्राध्यापिका, पोलीस कर्मचारी व अन्य पक्षाच्या पदाधिकारी महिला उपस्थित होत्या. भारतीयांनी स्त्रीला समाजाच्या मर्यादा, लज्जा, संस्कृती यांचे प्रतीक मानले आहे. स्त्री संरक्षण व स्त्री प्रतिष्ठा हे प्रगतीचे लक्षण मानले आहे. आज भारतीय स्त्री पुरुषप्रधान संस्कृतीचे लढत स्वताचे अस्तित्व निर्माण करून स्वकर्तुत्वाने पुरुषाच्या खांदयाला खांदा लावून यशस्वीपने कार्य करत असून ती समाजासाठी आर्दर्श बनली आहे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात असे. तशिच वागणूक कार्यक्रमातील सुत्रसंचालना वरुन दिसून येते.
जागतिक महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाची प्रसिद्धीसाठी स्थानिक नेर च्या पत्रकारांना प्राचारण करण्यात आले होते. अभिनेत्रीला पुढील कार्यक्रमाला जायचे असल्याने त्या अर्धवट कार्यक्रम सोडून निघून गेल्यात त्या निघून जाताच महिला कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करणारे यांनी मंच्यावरुन अशी अलाउस्मेन्ट केली की,हा कार्यक्रम महिलाचा आहे.पुरुष मंडळी असल्याने महिला खेळ खेळतात लाजतात, त्यामुळे पत्रकारांनी येथून निघून जावे,अशी स्पष्ट भाषेत सागण्यांत आल्यामुळे पत्रकार मंडळी तेथून निघून गेली.परंतु या दिवशी खेळ नसून सामूहिक नृत्य होते. या सुचने वरुन अनेक महिला अशा म्हणाल्या की,सुत्रसंचालन करणारा पुरुष नाही का? सभागृहातील उपस्थिता पैकी एकही महिला सुत्रसंचालनासाठी सक्षम न्होती का, मंच्यावर तिन व्यक्ति व्हिडिओत दिसत आहे ते पुरुष नाही का? महिलांच्यांच कार्यक्रमात महिलाचे सक्षमीकरण न करता सुत्रसंचालन स्वतः कडे ठेवून,महिलांना कमी लेखून महिलाचे खच्चीकरण करून महिलांनां दुय्यम र्दर्जाची वागणूक दिली. असे तेथील प्रेक्षक महिलांचे मत आहे.