क्राइम

गोवंश चामडी अवैध रित्या वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई चार आरोपींना अटक

Spread the love
 बडनेरा / प्रतिनिधी 
            पिकअप वाहन क्र MH 28 BB 3387  मधून अवैध रित्या गोवंश चामडी वाहून नेत असतांना कारवाई करण्यात येऊन चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
               .पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार वर नमूद वाहन क्रमांकातून गोवंश चामडी वाहून नेट असतांना अमरावती अकोला रोडवरील वडुरा गावाजवळ सदर वाहन थांबवून तपासणी केली असता ही घटना उघडकीस आली. त्यामुळे बडनेरा पोलिसांनी अप  क्रमांक – 195/23  कलम 269भा द वि सह 5(क),9(अ) महाराष्ट्र प्राणी रक्षक सुधारणा अधि 1995 नुसार गुन्हा नोंदवून आरोपी       1) सैयद दानिश सैयद हाशिद वय 24 वर्षे, रा मंगरुळपिर, टेकडीपुरा, जि वाशिम, 2) मोहसीन खान अजीम खान वय 30 वर्षे, रा कुरेशी नगर, लकडगंज, नवी वस्ती बडनेरा,3) अब्दुल सलाम कुरेशी अब्दुल रहमान कुरेशी वय 31 वर्षे, रा कुरेशनगर, लकडगंज, नवी वस्ती, बडनेरा, 4) नियाझ अहमद इस्माईस अहमद वय 40 वर्षे, रा लकडजंग, नवी वस्ती, बडनेरा  ( आरोपी- 1ते 4 आरोपीना अटक करण्यात आली आहे.
 घटना संबंधाने अमरावती शहर येथील गोरक्षक समितीचे सदस्यांनी पोलीस स्टेशन बडनेरा येथे जाऊन कारवाई बाबत माहिती घेतली असून अशाप्रकारे होणाऱ्या अवैध वाहतुकी संबंधाने यापुढे देखील कडक कारवाई व्हावी अशी चर्चेदरम्यान मागणी केली आहे. शांतता आहे
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close