गॅस व इंधन दरवाढीच्या विरोधात शिवसेना महिला आघाडी आक्रमक, तहसीलदारांना दिले निवेदन

नेर प्रतिनिधी / नवनाथ दरोई
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेर तालुक्यातील महिलांनी गॅस व इंधन दरवाढीच्या विरोधात आक्रमक मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा शिवसेना उद्धव ठाकरे कार्यालयापासून तर यवतमाळ अमरावती महामार्गावरून तहसील कार्यालयावर धडकला. गॅस व इंधनामध्ये झालेली प्रचंड दरवाढीच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या वतीने नेर तहसीलचे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.गॅस व इंधन दरवाढीच्या विरोधात महिलांनी केंद्र सरकारचा निषेध केला. आम्हाला मोदीचे 1550 रुपये गॅसचे “अच्छे दिन” नको, आम्हाला आमचे चारशे रुपये भावाने मिळत असलेले व 60 ते 70 रुपये भावाने मिळत असलेले इंधन तेच खराब दिवस आम्हाला पाहिजे. अच्छे दिनाच्या आमिश दाखवून केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेची लूट केली. निवडणुकीच्या आधी देण्यात आलेला “सबका साथ सबका विकास” चा नारा फोल ठरला असून या नाऱ्याने फक्त अडाणी, अंबानी यांचांच विकास झाला. केन्द्र सरकार च्या या दरवाढीमुळे अनेक महिलांना आर्थिक बजेट फुलाप्रमाणे कोडमडला आहे. वाढीव किंमती त्वरित कमी न झाल्यास शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला यापेक्षाही तीव्र आंदोलन करु असा ईशाराआदोलकांनी दिला. आंदोलन करतेवेळी शिवसेना महिला आघाडीच्या माया राणे, अर्चना माहुरे,ज्योती तंबाखे, वंदना उके,उज्वला महल्ले पुष्पा दरोई, सुमन गाढवे, अश्विनी जगताप, अरुणा पाटील, बोबडे व अन्य शिवसेना महिला पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते