नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 99 उमेदवारी अर्ज दाखल
इच्छुकांच्या गर्दीमुळे पॅनलच्या नेत्यांची डोकेदुखी वाढणार.
अंजनगाव सुर्जी ता. प्र.
—-कृषी उत्पन्न बाजारसमीतीच्या निवडणुकीचे उमेदवार नामांकणामध्ये शुक्रवारी ६१ अर्ज दाखल झाल्या नंतर सलग दोन दिवस सुटी आल्याने सर्वांच्या नजरा सोमवार, दि.३ एप्रिल या शेवटच्या दिवसाकडे वळल्या होत्या,अखेरच्या दिवशी एकुन ९९उमेदवारी अर्ज दाखल केले गेले त्यामुळे नामांकन दाखल करणाऱ्या उमेदवारांची संख्या १६० झाली आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार ३एप्रिलपर्यंत प्राप्त सर्व अर्जांची छाननी ५एप्रिलला केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ६ तारखेला वैध उमेदवारी अर्जांची छाननी यादी घोषित केली जानार असला तरी आज कृ.ऊ.बा.समीतीच्या आवारात इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी तोबा गर्दी केली होती,कोऱ्या १७५नामांकन अर्जाची झालेली उचल पाहता अखेरच्या दिवसाचे गर्दी पाहता अखेरच्या दिवशी सत्तर ऐशी नामांकण दाखल होईल असे वाटत असतांना ९९ अर्ज आल्याने नामांकन दाखल करणाऱ्या उमेदवारांची संख्या १६०पर्यत जाउन पोहचली असुन यात सेवा सहकारी संस्था प्रवर्गातुन महीला व पुरुषासह एकुन ७४ अर्ज,ग्रामपंचायत मतदारसंघातुन एकुन ६०तर अडते,व्यापारी व हमाल मतदार संघातुन मधुन २६ आर्ज भरल्या गेले आहेत. उमेदवाराच्या झालेल्या गर्दीमुळे दोन्ही पॅनलच्या नेत्यांमध्ये उमेदवारी देण्यासाठी चांगलीच डोकेदुखी होणार हे मात्र निश्चित.