अपघात

अमरावती वरून पुण्यात कामाच्या शोधात आलेल्या 9 लोकांना डंपरने चिरडले

Spread the love
तिघांचा मृत्यू ;  6 गंभीर जखमी,  तिघे झोपडीत असल्याने बचावले
पुणे / विशेष प्रतिनिधी
                  अमरावती वरून पुण्यात कामाच्या शोधासाठी आलेल्या 9 लोकांना डंपरने चिरडल्याची दुर्दैवी घटना वाघोली येथे घडली आहे. अपघात रात्री 12.30 च्या सुमारास घडला. यात 3 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 6 लोक गंभीर जखमी आहेत. हे सगळे लोक फुटपाथ वर झोपले असतांना मद्यधुंद चालकाने टिप्पर त्यांच्या अंगावर चढवला.  जखमींधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार डंपर चालक गजानन शंकर तोट्रे याला ताब्यात घेतले असून मेडिकल करण्यासाठी रुग्णालयात नेले आहे. त्यांच्याविरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जखमींना प्राथमिक उपचार आयनॉक्स हॉस्पिटल येथे करून ससून रुग्णालयात रवाना केले आहे. मृतदेह आयनॉक्स हॉस्पिटलमधून ससून येथे पाठवले आहेत.
अमरावतीहून आले होते पुण्यात
अपघातात जखमी झालेले सर्व मजूर आहेत. रविवारी रात्री ते अमरावतीहून कामानिमित्त आले होते. या पदपथावर एकूण 12 जण झोपले होते. बाकीचे लोक फूटपाथच्या बाजूला झोपडीत झोपले होते. भरधाव डंपर थेट फूटपाथवर जाऊन झोपलेल्या लोकांना चिरडले.
या अपघातात विशाल विनोद पवार वय 22 वर्ष, रा. अमरावती मूळ जिल्हा,  वैभवी रितेश पवार वय 1 वर्ष
 वैभव रितेश पवार वय 2 वर्ष यांचा मृत्यू झाला आहे. तर जानकी दिनेश पवार, 21 वर्षे , रिनिशा विनोद पवार 18 ,
 रोशन शशादू भोसले, 9 वर्षे ,
 नगेश निवृत्ती पवार, वय 27 वर्षे ,
दर्शन संजय वैराळ, वय 18
,  आलिशा विनोद पवार, वय 47 वर्षे हे गंभीर जखमी आहेत. यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close