हटके

80 लाख खर्चून तो त्याच्यासाठी ‘ ती ‘ झाला.पण नकार देतात ‘ ती ‘ चा पारा चढला 

Spread the love

कानपुर / प्रतिनिधी

दोघांची इंस्टाग्राम वर मैत्री झाली. त्यानंतर त्यांच्या भेटीगाठी वाढल्यन. पण दोघेही ‘ पुरुष ‘ असल्याने समाज लग्नाला मान्यता देणार नाही असे त्याला वाटले. त्यामुळे त्यापैकी एकाने  ‘ती ‘ बनण्याचा निर्णय घेतला. आणि त्यासाठी तिने टप्प्याटप्प्याने 80 लाख खर्च केले. पण जेव्हा ती त्याच्या शहरात पोहचली तेव्हा त्याने तिला लग्नास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या ‘ ती  ‘ ने  केले असे

इंदूरमधील जंजीर बाग पोलीस ठाणे परिसरात राहणारा दीप तनवानिया याचे कानपूरमधील चकेरी पोलीस ठाण्यात राहणारा वैभव शुक्ला याच्यासोबत प्रेमसंबंध होते. दोघांनी लग्न करायचे ठरवले होते. दीप वैभवच्या प्रेमात इतका पडला की त्याच्या सांगण्यावरून त्याने सुमारे लाखो रुपये खर्च केले आणि त्याचे लिंग बदलले. तो दीपवरून दीपामध्ये बदलला. वचन दिल्याप्रमाणे दीप लग्नासाठी कानपूरला आला तेव्हा वैभवने लग्नास नकार दिला. यामुळे दीप इतका दुखावला की, त्याने बदला घेण्यासाठी प्रियकर वैभवच्या गाडीला आग लावली.

काल कानपूर महानगरात घराबाहेर उभ्या असलेल्या कारला आग लागली. तेव्हा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता एक विचित्र घटना समोर आली.

कार जाळताना मध्य प्रदेशातील दोन रहिवासी पकडले गेले आहेत, त्यापैकी एकाने 80 लाख रुपये खर्चून ब्रेस्ट ट्रान्सप्लांट केले आहे. त्याने नाव देखील बदलून दीपा ठेवले आहे. कानपूर येथील रहिवासी असलेल्या तिच्या प्रियकराने तिला नकार दिल्यावर रागाच्या भरात दीपाने दुसऱ्या प्रियकरासह त्याची कार जाळली. बसने इंदूरला पळून जात असताना पोलिसांनी त्याला पकडले. चौकशीनंतर दोघांनाही मंगळवारी कारागृहात पाठवण्यात आले.

रामपुरा श्यामनगर येथील वैभव शुक्ला यांचे काका अनुप कुमार शुक्ला यांची एर्टिगा कार रविवारी रात्री स्कूटरवरून आलेल्या दोन तरुणांनी पेटवून दिली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दीपा आणि रोहन, यांना अटक केली

वैभवला आकर्षित करण्यासाठी मुलगी असल्याचे भासवायचे होते: दीपाने पोलिसांना सांगितले की 2021 मध्ये तिची आणि वैभवची इंस्टाग्रामवर मैत्री झाली. दोघेही सतत भेटत राहिले. दीपाने वैभवला लग्नासाठी विचारले असता, त्याने नकार दिला. त्यानंतर दीपाचे लिंग बदलाचे ऑपरेशन झाले तर वैभव तिच्याशी लग्न करेल, असे मान्य केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close