काकिशी पुतण्याचे प्रेम : काकाचा केला गेम

पिलीभीत / नवप्रहार मीडिया
अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या व्यक्ती बद्दल संबंधात असलेल्या प्रियकराच्या मनात नेहमी राग असतो. कारण याच्यामुळे त्याचे पूर्ण गणित बिघडत असते. त्यामुळे अश्या लोकांना मार्गातून हटवण्यासाठी प्रियकर किंवा दोन्ही कुठल्याही टोकाला जाऊ शकतात. या घटनेत देखील असेच झाले आहे. काकूंच्या प्रेमात पडलेल्या पूतण्याकडून काकाची हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यानंतर पुतण्या काकू सोबत दीड तास मोबाईल वर बोलला पण तिला या घटनेची जराही भणक लागू दिली नाही.
उपलब्ध माहिती नुसार पिलिभित जिल्ह्यातील गजरौला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उगनपूर येथील ही घटना आहे. आरोपी आकाश हा काकूंच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. आक्ष छा काका नंदलाल हा उत्तराखंडमधल्या रुद्रपूर येथील एका कारखान्यात मजुरी करत होता. तो सुटी मिळाल्यावर गावी येत होता. यावेळी तीन दिवसांची सुटी घेऊन तो गावी आला होता. नंदलाल (वय 28) याचा मृतदेह सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्याच्या शेतात आढळून आला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि.शव विश्चेदनासाठी पाठवला. त्यात नंदलालचा मृत्यू हा जखमांमुळे झाला असल्याचे स्पष्ट झालं. पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत प्रकरणाचा तपास सुरू केला.’
सुमारे एक वर्षांपूर्वी नंदलालला या प्रेम प्रकरणाची माहिती मिळाली होती. त्यानंतर काका आणि पुतण्या आकाश यांच्यात वाद झाला होता. घटनेच्या दिवशी रात्री दोघांमध्ये घराबाहेर पुन्हा वाद झाला. त्यावेळी आकाशने नंदलालच्या डोक्यात जोरात काठीने प्रहार केला. यात नंदलालचा जागीच मृत्यू झाला. चुलत्याची हत्या केल्यानंतर आकाश रात्री घरी येऊन झोपला. थोड्यावेळाने त्यान बाहेर येऊन पाहिले तर नंदलालचा मृतदेह घटनास्थळीच पडला होता. आरोपीच्या सांगण्यावरून हत्येसाठी वापरलेली काठी पोलिसांनी जप्त केली आहे.
दरम्यान, संशयावरून पोलिसांनी नंदलालचा पुतण्या आकाशला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. त्यात आकाशने त्याचा चुलता नंदलालची हत्या केल्याचे कबूल केले. माझे नंदलालच्या पत्नीसोबत अफेअर होतं, असं आकाशनं चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितलं. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.