व्यसन उपचार शिबिराचा ग्रामीण भागातील ७३ रुग्णांनी घेतला लाभ
गडचिरोली/ तिलोत्तमा समर हाजरा
: जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागात वसलेल्या विविध गावांत गाव संघटनेच्या मागणीनुसार मुक्तिपथतर्फे व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून एकूण ७३ रुग्णांनी उपचार घेत व्यसनमुक्त होण्याचा निर्धार केला. यावेळी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले.
भामरागड तालुक्यातील गोलागुडा येथे गाव पातळी व्यसन उपचार शिबिर घेण्यात आले. यात २० रुग्णांनी पूर्ण उपचार घेतला. रुग्णांची नोंद, गाव पातळी क्लिनिकचे व्यवस्थापन व नियोजन तालुका कार्यकर्ता आबिद शेख यांनी केले. यासाठी सुरेश मडावी, गाव पाटील सुखदेव पुंगाटी, लक्ष्मण होयामी, रामजी मडावी यांनी सहकार्य केले. एटापल्ली तालुक्यातील तुमरगुंडा येथे गाव पातळी व्यसन उपचार क्लिनिकमध्ये १४ रुग्णांनी उपचार घेतला. रुग्णाची नोंदणी रवींद्र वैरागडे यांनी केली. क्लिनिकचे नियोजन व व्यवस्थापन मुक्तिपथ तालुका संघटक किशोर मलेवार यांनी केले. क्लिनिकसाठी मुक्तिपथ गाव संघटन सदस्य केशव गावडे, पोलिस पाटील, सरपंच सविता गावडे, अशोक गावडे, आशासेविका तारा गावडे, अंगणवाडीसेविका मधूलीला सोयाम यांनी सहकार्य केले. दोन्ही शिबिरांत रुग्णाची केस हिस्टरी दशरथ रमकाम यांनी केली, तर रुग्णांचे समुपदेशन पूजा येलुरकर यांनी केले. सिरोचा तालुक्यातील मादाराम येथे गाव पातळी शिबिर घेण्यात आले. त्यात एकूण १२ रुग्णांनी नोंदणी केली आणि १२ रुग्णांनी उपचार घेतला. केस हिस्टरी छत्रपती घवघवे यांनी घेतली. शिबिरासाठी योगेश गावडे यांनी सहकार्य केले.चामोर्शी तालुक्यातील जामगिरी येथे एकदिवसीय गाव पातळी शिबिर घेण्यात आले. त्यामध्ये १८ रुग्णांनी नोंदणी केली व ११ जणांनी पूर्ण उपचार घेतला. छत्रपती घवघवे यांनी समुपदेशन केले, तर प्रभाकर केळझरकर यांनी केस हिस्टरी घेतली. संघटक आनंद इंगळे यांनी शिबिराचे आयोजन केले. शिबिरासाठी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, सचिव, उपसरपंच व गाव संघटनेचे पदाधिकारी व महिलांनी सहकार्य केले. देसाईगंज तालुक्यातील अरततोंडी जुनी येथील शिबिरात १६ जणांनी उपचार घेतला. रुग्णांची नोंदणी स्वप्निल बावणे, केस हिस्टरी नयना घुघुस्कर तर समुपदेशन प्राजू गायकवाड यांनी केले. शिबिराचे नियोजन तालुका संघटिका भारती उपाध्याय यांनी केले.
——————————