क्राइम

७० वर्षीय म्हातारी आणि तिच्या ४५ वर्षाच्या मूलाने तो दोघांना करायला लावले असे कृत्य की दोघांचा चढला पारा ,अन ….

Spread the love

मुंबई / विशेष प्रतिनिधी

                    अश्या काही घटना असतात की त्यावर विश्वास करावा अथवा नाही असा प्रश्न मनाला पडतो. ड्रीम्स अपार्टमेंट ,कामोठे, मुंबई येथे घडलेल्या एका घटनेने खरच असे घडले असेल काय ? असा प्रश्न पडतो. या अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या जितेंद्र आणि त्याच्या आईची दोघांनी मिळून हत्या केली आहे. पोलिसांनी जेव्हा या  घटनेचा तपास केला तेव्हा त्यांच्या समोर जो प्रकार आला त्यावर पोलिसांचा देखील विश्वास बसला नाही .

 असे काय घडले की दोन्ही मुलांनी आई व मुलाची निर्घृण हत्या केली, हा खुलासा पोलिसांनी केला आहे.मयत आई व मुलगा नवी मुंबईतील कामोठे परिसरातील ड्रीम्स अपार्टमेंटमध्ये राहत होते. शुभम महेंद्र नारायणी (१९) व संज्योत मंगेश दोडके (१९) अशी त्यांची हत्या करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले- अटक केलेल्या दोन्ही आरोपींनी आधी आम्हाला अनेक कथा सांगितल्या. पण नंतर त्यांनी असा एक किस्सा सांगितला जो ऐकून आम्हालाही आश्चर्य वाटले. आरोपीने सांगितले की, ३१ डिसेंबरच्या रात्री जितेंद्रने दोघांनाही आपल्या घरी पार्टीसाठी बोलावले होते.

आरोपी  म्हणाला- पार्टीदरम्यान, जितेंद्र व त्याच्या आईने माझ्यावर आणि माझ्या मित्रावर समलैंगिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला.व म्हणाले ‘चल, माझ्यासमोर सेक्स कर…’ यावरून आमचा त्यांच्याशी वाद झाला आणि त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. आरोपी शुभमने सांगितले की, यावेळी त्याने जितेंद्रच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केले, त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

प्रकरण नवी मुंबईतील कामोठे परिसरातील आहे. येथे दोन १९ वर्षांच्या मुलांनी गीता व जितेंद्र जग्गी यांची हत्या केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

गीता जग्गी यांचा गळा कापला

यानंतर, संज्योत मनेश याने गीता जग्गी यांचा गळा चिरला. हत्येनंतर दोघांनी घरातील मौल्यवान वस्तू चोरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने त्यांची ओळख पटवून त्यांना उलवे परिसरातून अटक केली.

पुरावा नष्ट करण्यासाठी गॅस लीक

मृत गीता आणि जितेंद्र यांचे मृतदेह त्यांच्या घरात आढळून आला असून, तेथे एलपीजी गॅसची गळतीही आढळून आली आहे. हत्येचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने ही गळती करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी खून व चोरीसह अन्य कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close