Uncategorized

सातलवाडा येथे 67 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

Spread the love

भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) साकोली तालुक्यातील
सातलवाडा येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर अभिवादन करण्याकरिता धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य शितलताई राऊत होते तो उद्घाटक पाहुणे म्हणून अंजली डोळ्याचा दवाखान्याचे नेते चिकित्सक डॉक्टर ओमेंद्र येळे, प्राचार्य अमोल हलमारे, राहूल तागडे, सामाजिक कार्यकर्ते डी जी रंगारी ,उमेश बोरकर पाथरीचे सरपंच पूजा देशमुख, भूमिकाताई धकाते ,सेवानिवृत्त शिक्षक सदाशिव रंगारी ,भगवान पटले, दुर्गेश राऊत ,सुखदेव मेश्राम व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला तसेच राहुल तागडे यांनी सांगितले की आजही मनुवादी डोके वर काढत आहे ठिकठिकाणी दलितांना गोरगरिबांना खालच्या स्तरावरून पाहून मूत्रविष्टही पाजले जाते, मनिपुरची घटनांमध्ये आदिवासी वर अन्याय करण्यात आला आणि आज आपल्याला राज्य घटनेचे रक्षण करायचे आहे घटना साबूत ठेवायचे राज्यघटना हे सर्वांसाठी अत्यंत आवश्यक आहे असे मत राहुल तागडे यांनी व्यक्त केले तर डॉ ओमेंद्र येळे यांनी सांगितले की जातीभेद न विसरता आपण सर्व समाजासोबत मिसळून एकमेकांच्या कार्यात सहभागी झालं पाहिजे पण माणूस म्हणून सर्वांना बघितले पाहिजे तेव्हा त्या देशातील एकता व एकमेकांना समस्या करीता आपण लढायला शिकलो पाहिजे असे मत केलें
तर सामजिक कार्यकर्ते डी जी रंगारी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तो नागपूरच्या दीक्षाभूमीवर जो धम्म दिला तो धम्म सर्वांनी व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा आचरण आणले पाहिजे आणि बौद्ध धम्माचा रथ कसा पुढे जाईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केले पाहिजे स्वातंत्र ,समता, बंधुता व सामाजिक न्याय हे विचारधारा रुजविली पाहिजे समानतेची वागणूक दिली पाहिजे अशा पद्धतीचे मत डीजी रंगारी यांनी आपल्या भाषणातून वेक्ट केले तर जिल्हा परिषद सदस्य शितल राऊत यांनी आपल्या भाषणात डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना राज्य घटना ही अतिशय मोलाची असून प्रत्येकांना अधिकार बहाल करण्यात आलेले त्यामुळे सर्वांनी बाबासाहेबांचे विचार आत्मसात करणे अत्यंत आवश्यक आहे आणि संघटित झाले पाहिजे शिक्षण घेतले पाहिजे मुलांना मोठे मोठे अधिकारी बनवले पाहिजे त्यासाठी सर्व पालकांनी आणि वडिलांनी लक्षात दिला पाहिजे आणि बाबासाहेबांचे आचरण आपण जर कराल तर खऱ्या अर्थाने समाज सुधारणा होईल असे मत व्यक्त केले यांनी खूप मेहनत घेतली रात्रीला दुय्यम कव्वालीच्या सामना प्रबोधनकार विकास राजा व प्रबोधनकार अश्विनी खोब्रागडे यांचा दुय्यम कव्वालीचा सामना शानदार प्रबोधनात्मक झाला त्यांच्यासोबत मंचावर गायक प्रबोधनकार तनुजा नागदेवे हे सुद्धा होते
आणि प्रबोधनाच्या माध्यमातून संगीताच्या माध्यमातून त्यांनी समाज कसा दुरुस्त होईल आणि बाबासाहेबांचा विचार कसा रुजेल हे पटवण्याचे त्यांनी प्रयत्न केले बहुसंख्य महिला आणि पुरुष वर्ग बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते हे विशेष

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close