क्राइम
६५ वर्षीय नराधमाचा तीन वर्षांच्या अल्पवयीन बालीकेवर अतिप्रसंग
रक्ताने माखलेली अल्पवयीन बालिका अस्वस्थ
आई वडीलांची माणसीक स्थिती ढासळली
अमरावती :
दर्यापूर तालुक्यातील वरुड कुलट येथील घटना घरासमोर खेळत असलेल्या तीन
वर्षांच्या अल्पवयीन बालिका चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर एका ६५ वर्षीय लिंगपिसाट नराधमाने अतिप्रसंग केल्याची घटना वरूड कुलट गावात घडली येवदा पोलिसांनी तक्रारीवरून प्रकाश भगवान फुंडकर (वय ६५) याच्याविरूध्द बि. एन. एस. कलम ६५(२)४,६, सह पास्को,गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची सर्विस्तर माहिती अशी की,अंगणात खेळत असताना मुलगी बराच वेळ दिसून न आल्याने आईने तिचा शोध घेतला असता गावातीलच प्रकाश पुडकर याच्यासोबत मुलगी गेल्याची माहिती मिळाली. आईने त्याच्या घरी जाऊन पाहिले असता मुलीचे रक्ताने माखलेले कपडे दिसून आले. तसेच प्रकाश पुंडकरच्या अंगालासुद्धा रक्त लागलेले दिसून आले. घडलेला प्रकार लहान मुलींच्या आईने फोन करून कामावर गेलेल्या पतीला सांगीतला पती तात्काळ घरी आले आणि त्यानंतर पालिकेच्या आई-वडिलांनी तात्काळ येवदा पोलीस स्टेशन गाठले. याप्रकरणी ठाणेदार विवेक देशमुख यांच्या प्रयत्नाने यांनी आरोपीला शोधण्यासाठी पथक तयार करून तात्काळ वरुड कडे रवाना झाले.गावागेल्यावर वासनाधिन नराधम आरोपी फरार झाला. तो शेतात असल्याचे कळताच पथक त्या ठिकाणी पोहोचले व मोठ्या शिताफीने आरोपीला ताब्यात घेतले.या पथकात येवदा पोलीस निरीक्षक देशमुख, पोलीस कर्मचारी पंकज नळकांडे, अनिल भटकर, विशाल कौलकार,अजय इवनाटे, महिला पोलीस कर्मचारी मुकेश मालोकार ,सुनिता चव्हाण यांचा समावेश होता.
वरुड कुलट येथे घडलेल्या घटनेमुळे या परिसरात लहान मुलांची सुरक्षा अश्या नराधमापासून धोक्यात येत असल्याचे जन चर्चा होत आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1