एकाच वेळी सहा मुलांना जन्म ; सगळे स्वस्थ
म्हणतात न की :” भगवान देता है तो छप्पर फाड कर देता है ” असच काहीसा प्रकार पाकिस्तान कॅब्या रावळपिंडी येथे घडला आहे. आम्ही असे यासाठी म्हणत आहोत की एकिकडे ज्यांना मुलबाळ होत नाही ते मूल व्हावीत यासाठी अनेक नवस करतात . कितीतरी डॉक्टर चे उंबरठे झिजवतात. अनेक उपाय करून देखील त्यांना अपत्य प्राप्ती होत नाही. पण येथे एका महिलेने3 एक दोन नव्हे तर चक्क सहा मुलांना जन्म दिला आहे. त्यापैकी चार मुले आणि दोन मुली आहेत.
यासंदर्भात पाकिस्तानमधील ‘डॉन’ या वृत्तपत्राने वृत्त दिले आहे. रावळपिंडी येथील रहिवासी मोहम्मद वाहीद यांची पत्नी झीनत वाहीद हिने या मुलांना जन्म दिले. झीनतने तासाभरात एकामागून एक सहा मुलांना जन्म दिला. आई आणि तिची सहाही मुलांची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
चार मुले अन् दोन मुली
फरजाना या सहा बाळांपैकी चार मुले आणि दोन मुली आहेत. त्या मुलांचे वजन दोन पौंडांपेक्षा कमी आहे. परंतु काळजीचे कारण नसल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी सांगितले. डॉक्टरांनी बाळांना इनक्युबेटरमध्ये ठेवले आहे. झीनतची ही पहिलीच प्रसूती होती. झीनतच्या प्रसूतीतील गुंतागुंत पाहून डॉ. फरझाना यांनी ऑपरेशनसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम तयार केली होती. या टीमने शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडली. डॉक्टर फरजाना यांनी सांगितले की, झीनतला मुलांना जन्म दिल्यानंतर आरोग्याशी संबंधित काही समस्या होत्या. मात्र, ते फारसे गंभीर नसून येत्या काही दिवसांत त्यांची प्रकृती सामान्य होईल.
ही घटना असामान्य
एकाच वेळी सहा मुलांचा जन्म होणे ही असामान्य घटना आहे, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. वेरीवेल फॅमिली डॉट कॉमनुसार, सेक्सटुपलेट्स म्हणजे एकाच वेळी सहा मुलांचा जन्म ही फार कठीण प्रक्रिया आहे. कोट्यवधी लोकांमधून एखाद्याबाबत असा प्रकार घडतो. या घटनेबद्दल डॉक्टरसुद्धा आश्चर्यचकीत झाले आहे. दरम्यान, सहा मुलांचा जन्म ही बातमी जगभराच चांगलीच पसरली आहे.
दरम्यान झीनतच्या कुटुबियांनी माध्यमांशी संवाद साधताना आनंद व्यक्त केला. वाहिद आणि त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले की, आमच्या कुटुंबाला एकाच वेळी मोठा आनंद झाला आहे. अल्लाहने त्यांना पुत्र आणि मुलींची देणगी दिली आहे, असे वाहिद यांनी सांगितले.