राज्य/देश

मध्यरात्री लागलेल्या आगीत निवृत्त DSP च्या कुटुंबातील 6 लोकांचा मृत्यू 

Spread the love

तीन जण गंभीर जखमी 

जम्मू- काश्मिर / नवप्रहार डेस्क .

               जम्मू काश्मिर मधून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर येत आहे. येथे निवृत्त DSP च्या घरी मध्यरात्री आग लागल्याने कुटुंबातील 6 लोकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. तर 3 जण गंभीर रित्या भाजले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जम्मू काश्मिरच्या कठुआमध्ये बुधवारी एक मोठी दुर्घटना घडली. कठुआ येथील शिवानगरमध्ये एका घराला लागलेल्या आगीत होरपळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 3 लोक बेशुद्ध झाले आहेत. घरामध्ये 9 जण झोपलेले असताना आग लागली अन् ही भयंकर घटना घडली. जखमी झालेल्या सर्वांवर कठुआ येथील जीएमसी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

(‘NDTV मराठी’ चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गंगा भगत- (वय 17 वर्षे), दानिश भगत- (वय 15 वर्षे), अवतार कृष्ण- (वय 81 वर्षे), बरखा रैना- (वय 24 वर्षे), तकश रैना- (वय 3 वर्षे) अद्विक रैना- (वय 4 वर्षे) अशी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. यामध्ये आगीच्या भक्षस्थानी सापडलेल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी आलेला शेजारीही गंभीर जखमी झाला आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

 

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close