जगात असे काही रहस्य आहेत ज्यांचा उलगडा करण्यात शास्त्रज्ञाना सुध्दा अपयश आले आहे. असाच एक रहस्यमयी धबधबा आहे. हा धबधबा सडावाघापूर येथे आहे. हा धबधबा उलटा धबधबा म्हणून प्रसिद्ध आहे.
या धबधब्यात कोणतीही वस्तू फेकली तर ती पुन्हा आपल्याकडे पुन्हा येत असते. या उलट्या धबधब्याचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर पुन्हा व्हायरल होत आहे. तर काय आहे हा उलटा धबधबा ते पाहूयात…
दरवर्षी पाऊस मनसोक्त बरसून जरा स्थिरावला की झाली कि पर्यटकांना या उलटया धबधब्याचे वेध लागतात. जुलै ऑगस्टमध्ये सडावाघापुर पठारावर पर्यटकांची झुंबड उडते. सुट्टीच्या दिवशी शेकडो गाड्या आणि हजारो पर्यटक याठिकाणी उलटा धबधबा पाहायला आलेले असतात. तर पाहूयात की हा रिव्हर्स पॉईंट नेमका कसा आहे.या संदर्भातील एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
तारळे पाटण रोडवर सुमारे 14 किमीवर असणाऱ्या सडावाघापुरला उलटा धबधबा ( रिव्हर्स पॉईंट ) आहे. दरवर्षी पावसाला सुरुवात झाली कि पर्यटकांना या उलटया धबधब्याचे वेध लागतात. जुलै आणि ऑगस्टमध्ये सडावाघापुर पठारावर पर्यटकांची दरवर्षी गर्दी होत असते.
सह्याद्रीच्या पठारावर अनेक पॉईंट
सह्याद्रीच्या पर्वत रांगात असे अनेक पॉईंट असतील जेथे डोंगर दरीतून वारा अशी शीळ घालत फिरत असतो. शिवनेरी किल्ल्यावर कधी रात्रीचा मुक्काम केला असेल तर चित्रपटातील हॉरर सीनमध्ये जसा वारा शीळ घालतो. तसाच वारे कोणत्याही कृत्रिम साईड इफेक्ट शिवाय ऐकायला मिळत असते. अशा प्रकारे महाबळेश्वरच्या प्रतापगडाचे दर्शन तुम्ही केले असेलच..तोच तो शिवरायांचा आठवा प्रताप..येथे जगातील सर्वात मोठे गनिमी युद्ध झाले होते. अफझल खान याचा कोथळा ज्या प्रतापगडाच्या पायथ्याशी काढला होता. तो महाबळेश्वर तालुक्यातील प्रतापगड चढताना देखील येथे असा एक पॉईंट आहे. तेथे जर बाटलीची झाकणे, झाडाच्या फांद्या किंवा पाने खाली तोडून टाकली तर दरीतील वारे पुन्हा त्या वस्तू आपल्याकडे वर टाकत असते.