आध्यात्मिक

लाखनी पोलीस स्टेशन अंतर्गत ५५५ ” श्री गणरायांची” ची नोंद

Spread the love

 

लाखनी शहरात १० सार्वजनिक गणेश मंडळांनी केली गणपतीची स्थापना*

लाखनी:- स्थानिक पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकूण ४५ सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना केलेली आहे. २० गावात एक गाव,एक गणपती तर ५१० घरगुती श्री गणरायाची स्थापना झालेली आहे.लाखणीत १० सार्वजनिक गणेश मंडळ यांनी प्रभाग क्रं.१सीपेवाडा रोड लाखनी,वार्ड क्रमांक ९ कुंभार मोहल्ला लाखनी, प्रभाग क्रमांक १२ निर्वाण मोहल्ला लाखनी,प्रभाग क्रमांक ४ नगरपंचायत जवळ लाखनी, प्रभाग क्रमांक ३ लाखोरी रोड संजय नगर लाखनी,पाण्याच्या टाकीजवळ लाखनी,दत्त मंदिर रोड परिसर लाखनी,सेलोटी रोड लाखनी,आदर्श नगर प्रभाग क्रमांक ४ लाखनी, प्रभाग क्रमांक ३ संजय नगर लाखनी, मुरमाडी/सावरी येथे ३,पोहरा येथे ४,पिंपळगाव/सडक येथे २, रेंगेपार/कोहळी येथे २ व गडेगाव येथे २ गणपतीची स्थापना करण्यात आलेली आहे.

*२० गावात एक गाव एक गणपती*
लाखनी पोलिस ठाण्याचे हद्दीतील रेंगेपार/कोठा, निलागोंदी,मेंढा/पोहरा,पेंढरी,गुंथारा, राजेगाव/एमआयडीसी, नान्होरी,मोरगाव,खेडेपार, कनेरी/दगडी, बाम्हाणी,मानेगाव/बेळा,  खुटसावरी,बोरगाव,सोमलवाडा,  सिपेवाडा,किन्ही,मुंडीपार/ सिंधीपार,धानला,दिघोरी अशा २०गावात एक गाव एक गणपती असून उत्सव काळात कायदा, सुव्यवस्था व शांतता अबाधित ठेवावी असे आवाहन पोलिस निरीक्षक हृदयनारायन यादव  यांनी केले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close