हातूर्णा येथील नागरिकांच्या घरात शिरले पावसाचे पाणी
वरूड/तूषार अकर्ते
येथून जवळच असलेल्या हातुर्णा गावात दि.२१ जुलै रोजी ढगफुटी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ४ ते ५ वाजता च्या दरम्यान सतत १ तास सुरू असलेल्या पावसाने सर्वत्र पाणी पसरले असता याचा फटका येथील स्थानिक नागरिकांना बसला आहे. या पावसात थोड्या प्रमाणात गारांचा वर्षाव झालेला दिसुन आल्याचे कळते. ज्या भागात नवीन सिमेंट रोड बांधण्यात आले आहे त्या रोडवर पुल न बांधता पायल्या टाकण्यात आल्यामुळे पावसाचे पाणी पायल्याला अडुन थेट गजानन महाराज मंदिरात तसेच बाजूलाच असलेल्या बिरसन बुवा सभागृहात शिरले आहे.या भागात राहणारे रामेश्वर परतेती व वार्ड क्र.२ मधील मोहन फुके , विलास रामटेके, सुधाकर ठाकरे यांच्या घरामध्ये पानी शिरल्याने घरातील जीवनावश्यक वस्तू खराब झाल्या आहे.या भागातील नाल्या मधुन पावसाचे पाणी पास न झाल्याने हे पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिकांना हा नाहक त्रास सहन करावा लागला आहे.या पूढे ग्रामपंचायत ने या कडे काळजीपूर्वक लक्ष देऊन भविष्यत अशा समस्या उद्भवणार नाही.या कडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.पावसाच्या पाण्याने ज्या नागरिकांचे नुकसान झाले आहे त्यांचे शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे शाखा प्रमुख पंकज ठाकरे, मोर्शी विधानसभा अध्यक्ष मंगेश कोरडे, राहुल बोरवार यांच्या कडुन करण्यात आली आहे.