क्राइम

बलात्काराचा आरोप असलेल्या शिक्षकाच्या मोबाईल मध्ये सापडल्या 45 अश्लील क्लिप्स 

Spread the love

सुरत  / नवप्रहार मीडिया .

               विद्यर्थिनींवर बलात्काराचा आरोप असलेल्या शिक्षकाच्या मोबाईल मध्ये 45 अश्लील व्हिडीओ क्लिप्स आढळून आल्या असून त्यापैकी 12 व्हिडिओत हा शिक्षक स्वतः दिसत असल्याने त्याच्यावर आणखी एक एफआयआर नोंदवण्यात आला आहे. याबाबत पॉक्सो न्यायालयात खटला सुरू आहे. गुजरातमध्ये अलीकडच्या काळातली अशा प्रकारची दुसरी घटना आहे.

गुजरातमधल्या बडोद्यातल्या 17 वर्षांच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या शिक्षकाबाबत अनेक नवीन बाबी उघड होत आहेत. या शिक्षकाने केवळ या विद्यार्थिनीसोबतच नव्हे, तर अनेक विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण केलेलं आहे. आरोपीच्या फोनमध्ये 45 अश्लील व्हिडिओ सापडले असून, हे व्हिडिओ या शिक्षकाने चित्रित केले आहेत. जेव्हा तो मुलींवर बलात्कार करत तेव्हा तो त्या दुष्कृत्यांचा व्हिडिओ बनवत. आरोपीनं हे व्हिडिओ डिलीट केले नव्हते. यापैकी काही व्हिडिओत तो स्वतःसुद्धा दिसत आहे.

एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी पॉक्सो न्यायालयाने नुकतंच एका शिक्षकाला दोषी ठरवलं होतं. संबंधित शिक्षकाच्या फोनमध्ये अनेक अश्लील व्हिडिओ सापडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण 45 व्हिडिओंपैकी 12 व्हिडिओमध्ये हा शिक्षक स्वतः विद्यार्थिनींशी गैरवर्तन करताना दिसत आहे. उर्वरित व्हिडिओंमध्ये फक्त पीडित मुली दिसत आहेत. या व्हिडिओंबाबत संबंधित शिक्षकाविरुद्ध पुन्हा वेगळा एफआयर नोंदवला गेला. याबाबतची सुनावणी सध्या पॉक्सो न्यायालयात सुरू आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
2
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close