कत्तली करीता जात असलेले ४२ ७ लक्ष ६९ हजार बैलांची सुटका, आरोपीतांविरुध्द गुन्हा दाखल
वरूड/तूषार अकर्ते
रविवार दि.६ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता च्या सुमारास ठाणेदार अवतारसिंग चव्हाण यांना मिळालेल्या गोपनिय माहीती वरून ग्राम राजुरा, नरखेड, नागपुर कडुन ग्राम राजुरा मार्गे काही इसम गोवंशाची कत्तल करण्याचे उददेशाने गोवंशाना निर्दयतेने वागणुक देत पायदळ वाहतुक करत आहे.अशा माहीती वरुन ठाणेदारांनी वरुड पोलीस स्टेशनचा स्टाफ ग्राम राजुरा येथे रवाना केला असता पोलीसांनी राजुरा ते डवरगाव येथे नाकाबंदी केली असता सकाळी ९.३० वाजता च्या दरम्यान नामदेव जंगलु जगदिवे, रशिद शहा नजिरशहा रा.दर्गा मोहल्ला मोर्शी, अशोक श्रिपदराव गाडगे रा. उदापुर हे तिन इसम ७ लक्ष ६९ हजार किमतीचे गोवंश जातीचे एकुण ४२ बैल एकमेकांसोबत मानेला बांधुन बांबुचे काठीने टोचत मारहाण करत पायी हाकलत कत्तली करीता घेवुन जाताना दिसले असता त्यांना पोलीसांनी विचारपुस केल्या नंतर रज्जाक कुरेशी, कय्युम कुरेशी, इरफान कुरेशी सर्व रा.बंगला चौक वरुड, शेख अयुब शेख युसुफ कुरेशी, अब्दुल हाफीज अब्दुल अजीज दोन्ही रा.पेठ पुरा मोर्शी यांचे सांगणेवरुन नमुद ४२ गोवंश कत्तली करीता घेवुन जात असल्याची त्यांनी माहीती दिल्याने सर्व आरोपी विरुध्द पोलिसांनी गुन्हा नोंदवुन ४२ गोवंशाना पोलिसांनी गोपाळकृष्ण गोरक्षण संस्था वरुड येथे संगोपनाकरिता दाखल केले . सदरची कारवाई पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधिक्षक शशिकांत सातव, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनात ठानेदार अवतारसिंग चव्हाण, पोलिस उपनिरिक्षक धिरज राजुरकर, राजु चव्हाण, विनोद पवार, सुरेश कांबळे, नंदकिशोर गवते, पवन भोकरे, योगेश ढंगारे, गजानन सोनोने, संतोष वंजारी, किरण दहिवाडे, प्रफुल लेव्हरकर, आकाश आमले, कैलास हटवार, अशोक भुसारी यांनी केली आहे. पुढील तपास वरूडचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात धिरज राजुरकर करीत आहेत.