यवतमाळ शहरात ४० अनधिकृत होर्डिंग , नगरपरिषद यवतमाळ पथकाचे धडक कारवाई.
यवतमाळ / प्रतिनिधी
यवतमाळ मुंबई येथे झालेल्या होर्डिंग अपघातामुळे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये अनुधिकृत होर्डिंगची तपासणी केल्या जात असून त्यावर ती कारवाई सुद्धा शासनामार्फत केल्या जात आहे त्याच अनुषंगाने यवतमाळ येथे सुद्धा नगरपरिषद मार्फत पथकाच्या मार्फत घडत कारवाई केल्या जात असून ज्यांची मुदत संपली आहे अशा होर्डिंग वरती कारवाई केल्या जात असून आज मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी ४० अनधिकृत होर्डिंग धारकांवरती कारवाई केल्याची माहिती जनमाध्यम ला दिली.
आज दिवसभरात अनधिकृत असलेले होर्डिंग काढून नगरपरिषद परिसरामध्ये जमा करण्यात आले ज्यांचे परवाने अधिकृत आहे अशा होर्डिंगची सुद्धा सुरक्षा पक्की आहे की नाही याची खात्री सुद्धा यावेळेस करण्यात आली.
जिल्हाधिकारी यांनी मुख्याधिकारी यांना यवतमाळ शहरातील तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद स्तरावरील होर्डिंग ची तपासणी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे यादरम्यान यवतमाळ मुख्याधिकारी यांनी नगरपरिषद तसेच अधिकारी कर्मचारी यांची एक पथक गठीत करून शहरात जाहिरातीचे फलक तपासणी सुरू केली यातील अनधिकृत आणि परवानगी धारक अशा दोन्हीही होर्डिंग फलकांची पाहणी करून कारवाई सुद्धा करण्यात आली.