हटके

33 व्या मजल्यावरन कोसळला 27 वर्षीय अभियंता  पार्टी जिवावर बेतली

Spread the love

बंगळुरु / नवप्रहार मिडिया

31 डिसेंबर म्हटलं की तरुणाई वेगळ्याच मानसिकतेत असते.त्यांना सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करावयाचे असते. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई वेगवेगळे प्लॅनिंग करत असतात. काही बाहेरगावी जिथे पब आणि इतर सुविधा असतात त्या ठिकाणी जातात. काही जण 31 डिसेंबर ला गर्दी असते म्हणून एक दोन दिवसांपूर्वीच पार्टी करतात. मित्राच्या फ्लॅट वर न्यू ईयर साजरा करण्यासाठी गेलेल्या अभियंता तरुणाचा 33 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. तो सिगारेटची अ‍ॅश फेकण्यासाठी गेला आणि तोल जाऊन पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात आहे की आणखी काही या दिशेने देखील पोलीस तपास करत आहेत.

ही घटना बंगळुरुतील पश्चिम भागात घडली आहे. दिव्यांशू शर्मा असे मृत्यू झालेल्या 27 वर्षीय अभियंत्याचे नाव आहे. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरु आहे.

दिव्यांशू शर्मा  हा अॅश फेकण्यासाठी फ्लॅटच्या बाहेर आला तेव्हा तो झोपत होता. यावेळीच तो बंगळुरुमधील अपार्टमेंटमध्ये वॉकिंग ट्रॅकवर कोसळला, अशी माहिती प्राथमिक तपासातून समोर आलीये. दिव्यांशू शर्मा हा मूळचा उत्तरप्रदेशातील राहिवासी आहे. सध्या तो बंगळुरूतील कोडिगेहल्ली भागातील (केआर पुरा) या भागात राहत होता. त्याचे वडिल भारतीय नौदलात कार्यरत होते. सध्या ते निवृत्त झाले आहेत. सध्या ते कुटुंबातील इतर सदस्यासमवेत Horamavu येथे राहत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिलीये.

दिव्यांशू मृत अवस्थेत सापडल्यानंतर सोसायटीतील लोकांनी सकाळी याबाबतची माहिती व्हॉट्सअॅप ग्रुपवरुन सर्वांना दिली. “एका व्यक्तीचा मृत्यूदेह वॉकिंग ट्रॅकवर आढळला. त्याच्याजवळून आयडी सापडल्यामुळे त्याची लगेच ओळख पटली. त्यानंतर त्याच्या सर्व मित्रांची आम्ही चौकशी केली. तरुणाचा मृत्यू कशामुळे झाला हे पाहण्यासाठी आम्ही शवविच्छेदन अहवालाची वाट पाहात आहोत, असे पोलिसांनी सांगितले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close