क्राइम
२७ वर्षीय महिलेवर आळीपाळीने झालेल्या सामूहिक बलात्काराने जिल्हा हादरला

दोन आरोपींस घाटंजी पोलिसांनी ठोकल्या बेड्या; दोघे जण फरार
नराधम वासनाअंध आरोपी समाजात उच्च प्रतिष्ठित घराण्यातील
घाटंजी (यवतमाळ ) तालुका प्रतिनिधि-
नवऱ्या सोबत भांडण झाल्याने रागाच्या भरात एकटीच निघालेल्या विवाहित महिले सोबत सहानुभूती दाखवत चार लोकांनी आळीपाळीने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपी फरार आहेत.गुन्ह्यात आणखी आरोपी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून आरोपी प्रतिष्ठित घराण्यातील असल्याची देखील चर्चा आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार तालुक्यातील विवाहित पीडित महिला तिच्या पती आणि एका मुलीसह वास्तव्याला आहे. विवाहितेचा पती घाटंजीत एका हॉटेलमधे रोजमजूरी काम करीत असून पीडित महिला ही मजुरी करीत उदर निर्वाह चालविते. होळीचा सण रंगाचारी व आनंदाचा यामूळे २४ मार्चला होळी साजरी करण्यासाठी या न दामपत्या नी आपल्या चिमुकली सह सासरी जायचे ठरविले. पीडित महिला,तिचा पती, मुलीसह घाटंजी पासून तीन किमी अंतरावर असलेल्या मुर्ली गावात पोहोचले. होळी आणि रंगपंचमी आनंदात साजरी केली पण,दि. २६ मार्चला रात्री ९.३० चे आसपास पीडित महिला व पतीचे काही शुल्लक कारणा वरुन घरगुती वाद सुरू झाले.त्यामुळे रागात पीडित महिला रात्री १० वाजता चे सुमारास घाटंजीस येण्यासाठी एकटीच स्कुटीने मोपेड गाडीने निघाली मुर्ली गावचे काही अंतरावर रस्त्यात रोडलगत असलेल्या राऊत यांच्या शेतातील फार्म हाऊसच्या गेटवर त्यावेळी नयन सुरेश राऊत वय ३५ रा. मुर्ली, चेतन राजु वारकड वय ३२ रा. मुर्ली हे रस्त्याच्या कडेला शेतासमोर उभे होते.
स्कुटी वर रडत चाललेल्या पीडितेवर त्यांची नजर पडल्याने त्यांनी तिला थांबवून सहानुभूती दाखवत तिची विचारपूस केली.तेव्हा रडतचं पीडितेने त्यांना माझे नवऱ्यासोबत भांडण झाले हे सांगितले. एकटी महीला त्यात रडत असल्याने त्यांनी पीडित महीलेस त्यांचे शेतातील फार्महाऊस जवळ असलेल्या लाकडी बाकड्यावर सात्वनाच्या बहाण्याने बसवले आणि त्या दरम्यान, नयन राऊत व त्याचे मित्र यांनी पडितेस उचलून फार्महाऊसच्या बाजूला असलेल्या एका खोलीमध्ये नेऊन नयन राऊत, चेतन वारकड, वैदीप देवकते आणि दर्शन गोफने या चारही जणांनी पीडितेवर आळीपाळीने सामूहीक अत्याचार केला आणि धमकावत पळ काढला. यानंतर ती भेदारलेली महीला फार्महाऊसवर बेशुद्ध अवस्थेत होती. दुसऱ्या दिवशी कशीबसी यातून सावरत विवाहिता घरी परतली. मात्र भेदारलेली अवस्था असल्याने तिने तीन दिवस या घटनेची वाच्यता केली नाही.बदनामी पोटी आणि बड्या आसामीचे छत्र या अत्याचारी नराधमावर असल्याने तिने याची वाच्यताही केली नाही. मात्र, पतीने धीर दिल्याने तिने अखेरीस दि. २८ ला घाटंजी पोलिस स्टेशन गाठून घटनेची माहीती दीली त्यानूसार कार्यवाही सुरू आहे. पोलिसांनी आरोपी नयन सुरेश राऊत वय ३५ रा. मुर्ली, चेतन राजु वारकड वय ३२ रा. मुर्ली यांना अटक केली असुन वैदीप संतोष देवकते वय २३ रा. मुर्ली आणि दर्शन दिनेश गोफने वय ३१ रा. मुर्ली हे फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहे. या प्रकरणात गावातील काही प्रतिष्ठित घराण्यातील तरुणांचा समावेश असल्याची देखील चर्चा आहे. पोलीस त्या दिशेने देखील तपास करीत आहे.
..
What’s your Reaction?
+1
+1
1
+1
+1
+1
+1
+1
1