२५ जुन रोजी एलआयसी ओबीसी कर्मचाऱ्यांचे वार्षिक संमेलन नागपुरात
नागपुर / अमित वानखडे
भारताचे माजी पंतप्रधान मंडल आयोगाचे जनक स्व.विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या जयंतीचे औचित्य साधून नागपुर डिवीजन एलआयसी ओबीसी कर्मचारी वेलफेअर असोसिएशनचे वार्षिक संमेलन रविवार दि.२५ जुन २०२३ रोजी सकाळी १० वा.एलआयसी मुख्यालयात आयोजित केले आहे.
या संमेलनाचे उद्घाटन ओबीसी मुक्ती मोर्चाचे मुख्य संयोजक मा.नितीन चौधरी यांचे शुभ हस्ते होईल.मुख्य अतिथी म्हणून एलआयसीचे विभागीय व्यवस्थापक सांबशिव राव, सत्यशोधक चळवळ साहित्याचे अभ्यासक डॅा.अशोक चोपडे, संस्थापक अध्यक्ष इंद्रपाल जवंजाळकर, एलआयसीचे ओबीसी नेते योगीराज घोटेकर इ.मान्यवर उपस्थित राहणार आहे.
एलआयसी ओबीसी कर्मचाऱ्यांपुढील आव्हाणे,
आगामी काळाकरीता नविन कार्यकारीणीची निवड,जमाखर्चाला मंजुरी देणे, विविध प्रस्ताव इ.वर संमेलनात चर्चा करण्यात येईल. या प्रसंगी ज्येष्ठ ओबीसी नेत्यांचा सत्कार करण्यात येईल.
या संमेलनाला एलआयसी ओबीसी सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष योगेश चव्हाण व सरचिटणीस आरती झोटींग यांनी केले आहे.यशस्वीतेकरीता सर्वश्री मुकेश अजमिरे, देविदास बांते, नरेंद्र उमाळे, नितीन वडेट्टीवार, नरेश अडचुले, माधुरी गुरनुले, जोत्स्ना चरडे,किशोर भोज,संजय पडोळे,मुकेश जुमडे,गजेन्द्र वाळके, रतन शेंडे, माधुरी गणोरकर,किशोर चेटुले, विजय हरणे,सुरेश जांभुळकर इ. कठोर परिश्रम करीत आहे.