आरोग्य व सौंदर्य

२३ वर्षाचा विद्यार्थी हार्ट अटॅक च्या धक्क्याने दगावला

Spread the love
 

सोलापूर /विशेष प्रतिनिधी 

             हल्ली हृदय विकाराचा झटका हा सर्वसामान्य आजार झाला आहे. सध्या कुठल्याही वयातील लोकांना हार्ट अटॅक येऊ लागला आहे. सोलापूर शहरात नुकतीच अशीच घटना घडली आहे. येथे एका २३ वर्ष वयाच्या विद्यार्थ्याला हृदय विकाराचा झटका आला आहे, त्यात त्याचा मृत्यू झाला आहे.

हर्षवर्धन महेश इंगळे (वय २३ वर्षे, रा. राघवेंद्र नगर, मुरारजी पेठ, सोलापूर) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे.

गुरुवारी सकाळी राहत्या घरात हर्षवर्धनला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. घरातील नातेवाईकांनी ताबडतोब त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी हर्षवर्धनला मृत घोषित केले. हर्षवर्धन इंगळे हा डी फार्मसीच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता.

हर्षवर्धनच्या मृत्यूने सोलापुरात हळहळ

हर्षवर्धन हा मनमिळाऊ स्वभावाचा होता. त्याच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हर्षवर्धनच्या पश्चात आई, वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे.

हर्षवर्धन इंगळे याचे वडील मोडनिंब (ता माढा, जि सोलापूर) येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात लिपीक म्हणून कार्यरत आहेत. हर्षवर्धनला हृदयविकाराचा झटका आला त्यावेळी त्याचे वडील महेश इंगळे हे ड्युटीवर होते. हर्षवर्धनला दवाखान्यात ऍडमिट केले आहे, असे सांगून महेश इंगळे यांना घरी बोलावण्यात आले. हर्षवर्धनच्या अकाली जाण्याने इंगळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close