अपघात

बस दरीत कोसळली ; 22 प्रवाश्यांचा जागीच मृत्यू

Spread the love
LO

अल्मोडा / नवप्रहार डेस्क             आज सकाळी उत्तराखंड मध्ये बस  100 फूट खोल दरीत कोसळून घडलेल्या  अपघातात 22 प्रवाश्यांचा जागीच मृत्यू झाला आहे . तर अनेक प्रवाशी गंभीर जखमी आहेत. अल्मोडा जिल्ह्यातील सल्ट इथल्या मारचूला इथंनाही दुर्दैवी घटना घडली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सोमवारी सकाळी रामनगरहून एक बस रानीखेतच्या दिशेने जात होती. मारचुला जवळ पोहोचताच चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि बस दरीत कोसळली. बस कोसळल्याची माहिती मिळताच बचावपथक घटनास्थळी दाखल झाले.

बसमधून एकूण 40 प्रवासी प्रवास करत होते अशी माहिती समोर येतेय. 22 जणांचा जागीच मृत्यू झाल्याचं वृत्त असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून बचावकार्य वेगाने राबवलं जात आहे. रामनगर आणि अल्मोडा इथून रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं जात आहे.

बसची प्रवासी क्षमता 42 इतकी होती. तर बसमधून 40 प्रवासी प्रवास करत होते. दुर्घटनेनंतर काही प्रवासी स्वत:च बाहेर पडले. तर काही लोक अपघातानंतर बाहेर फेकले गेले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. मृतांची संख्या 22 वर पोहोचली असल्याची प्राथमिक माहिती समजते. याबाबत अधिकृत माहिती अद्याप प्रशासनाने दिलेली नाही.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close