22 जानेवारी विशेष सुट्टी जाहीर!

अयोध्येतील श्रीप्रभू रामचंद्रांच्या प्रतिष्ठापनेला काही तासांची प्रतिष्ठा आहे. 22 जानेवारीला होत असलेल्या प्राणप्रतिष्ठापना सोहळा जणू काही दीपावलीच आहे अस राम भक्त सांगत आहेत. या सोहळ्याच्या निमित्ताने अर्ध्या दिवसाची सुट्टी केंद्र सरकारने जाहीर केली आहे.
केली आहे. केंद्र सरकारच्या कार्मिक मंत्रालयाने या संदर्भात आदेश काढले आहेत.
सरकारने सर्व केंद्र सरकारी कार्यालये, केंद्रीय संस्था
आणि केंद्रीय औद्योगिक येथे अर्ध्या दिवसाची सुट्टी
जाहीर केली आहे. 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी
2:30 वाजेपर्यंत आस्थापनेला सुट्टी असेल. देशभर
२२ जानेवारीला दिवाळी साजरी केली जाणार आहे.
लोकांमध्ये मोठा उत्साह आहे.
अयोध्येतील राम मंदिराच्या गाभाऱ्यात रामललाची
प्रतिष्ठापना करण्यात येईल. या ठिकाणी ५ मंडप
असतील. मंदिर तळमजल्यावर असून इथल्या
भागाचं काम पूर्ण झालं आहे, अशी माहिती राम मंदिर निर्माण समितीचे चेअरमन नृपेंद्र मिश्रा यांनी दिली. मंदिराच्या पहिल्या मजल्यावरील थोडं काम शिल्लक आहे. इथे राम दरबार असेल. मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावर विविध प्रकारचे यज्ञ आणि धार्मिक विधी होतील, असं त्यांनी सांगितलं.
गोरेगाव येथील राम भक्त श्रीमती आरती शर्मा यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सरकारने सुट्टी जाहीर केली आहे यामुळे आमचा आनंद द्विगुणित झाला आहे. रविवार पासूनच आम्ही आमच्या विभागात श्रीरामाच्या स्वागतार्ह पूजा अर्चना, आयोजन केले आहे. राज्य सरकार सुध्दा लवकरच सुट्टी जाहीर करेल असा विश्वास जितेंद्र महाजन यांनी सांगितले. देशात अभूतपूर्व असा हा उत्सव साजरा होईल अशी प्रतिक्रिया मिनरल परेरा यांनी सांगितले. केवळ हिंदूस्थानातच नव्हे तर विदेशातही श्रीराम प्रतिष्ठापना उत्सव साजरा होईल अशी माहिती राम भक्तांनी दिली.