Uncategorized

हिचे माझ्या सोबतही लग्न झाले होते हे ऐकताच नवरीचा पोबारा 

Spread the love

हिचे माझ्या सोबतही लग्न झाले होते हे ऐकताच नवरीचा पोबारा 

श्रीगोंदे /नवप्रहार ब्युरो 

                     मुले आणि मुली यांच्या जन्म प्रमाणात बरीच तफावत असल्याने लग्नाळू तरुणांना मुली मिळणे आता कठीण होऊन बसले आहे. याच गोष्टीचा गैरफायदा काही मंडळी घेत आहेत. ते मुलाच्या कुटुंबियांकडून काही रक्कम घेऊन त्यांना मुलगी दाखवतात. लग्न होऊन जेव्हा मुलगी घरी येते तेव्हा ती लग्नाच्या दुसऱ्या किंवा मधु चंद्राच्या रात्री घरातील रक्कम आणि अंगावरील दागिने घेऊन पळ काढते. असाच काहीसा प्रकार या प्रकरणात घडला आहे.

लग्नानंतर सोळाव्याच्या कार्यक्रमाला आलेल्या एका पाहुण्याने नवरीला पाहिल्यानंतर ‘माझंपण हिच्यासोबतच लग्न झालतं’ असे सांगितल्याने एकच खळबळ उडाली. त्यातून लग्नाच्या फसवणुकीचा आणखी एक प्रकार उघडकीस आला.दरम्यान, आपले भांडं फुटल्याचे लक्षात येताच नवरीने आपल्या सहकाऱ्यांसह तिथून पळ काढला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील पूर्वेकडील एका गावातील तरुणाचे लग्न जमत नव्हते. त्यामुळे एका मध्यस्थीच्या मदतीने २ लाख ६० रुपये देण्याचे ठरवून लग्न जमविण्यात आले. ४० हजारांची रक्कम देऊन साखरपुडा झाला. उर्वरित रक्कम देऊन नोव्हेंबर महिन्यात लग्नही लावण्यात आले.

लग्न झाल्यानंतर सोळाव्याच्या कार्यक्रमाला पाहुण्याने निमंत्रण देण्यात आले. यावेळी आलेल्या एका पाहुण्यांनी नवरीला पाहिले आणि ‘माझंपण हिच्यासोबतच लग्न झालतं’ असे सांगितले. पाहुण्यांचे बोलणे ऐकून कार्यक्रमस्थळी एकच खळबळ उडाली.

त्यावेळी पाहुण्यांनी अधिक खुलासा करीत सांगितले की, २०२३ मध्ये याच मुलीसोबत माझे लग्न झाले होते. त्यांना दोन लाख रुपये दिले व नंतर ती पळून गेली. त्याच मुलीचे लग्न आता तुमच्या मुलासोबत लावले आहे.

दरम्यान, दोन नातेवाईकांमध्ये चाललेले संभाषण नववधू ऐकत होती. आपले भांडे फुटल्याचे लक्षात येताच ती सहकाऱ्यासह तिथून पळून गेली. फसवणूक झालेल्या कुटुंबाने मध्यस्थाशी वेळोवेळी संपर्क करूनही त्याने रक्कम माघारी देण्यास नकार दिल्याने त्या कुटुंबाने आता श्रीगोंदे पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
2
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close