क्राइम

2 लाखांत 19 वर्षीय तरुणीची विक्री, जबरान लावुन दिले लग्न

Spread the love
नाशिक / विशेष प्रतिनिधी
              एका 19 वर्षीय तरुणीची 2 लाखांत विक्री करून तिचे जबरान लग्न लावून दिल्याची संतापजनक घटना नाशिक येथे उघडकीस आली आहे. पोलिसांनी वेळीच ॲक्शन घेतल्याने तरुणीची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल दोन लाखांत 19 वर्षीय तरुणीची विक्री करून तिचं जबरदस्तीने लग्न लावून दिल्याची धक्कादायक घटना नाशिक येथे घडली आहे… घडलेल्या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे… आता याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत.

तरुणीला इव्हेंटच्या कामाचे आमिष दाखवून दोन महिलांनी मालेगावमार्गे जातेगावला नेलं. त्यानंतर तिचं बळजबरी लग्न लावून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांच्या धडक कारवाईमुळे तरुणीची सुखरुप सुटका झाल्याची माहिती देखील समोर येत आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close