विदेश

वाचा कुठे झाला अंधाधुंद गोळीबार, गोळीबारात १८ लोकांचा मृत्यू तर १६ पेक्षा जास्त लोक जखमी 

Spread the love

सिरिया-/ नवप्रहार मीडिया

 पश्चिमी आशियाई देश सीरियामध्ये दहशतवाद्यांनी तांडव घातला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी पूर्व सीरियातील ग्रामीण भागामध्ये अंधाधुंद गोळीबार सुरु केला होता. यात १८ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

तर, १६ पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.

बुधवारी झालेल्या गोळीबारात ५० पेक्षा अधिक लोक बेपत्ता असल्याचं कळत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामीण भागामध्ये काही लोक एकत्र काम करत होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. अचानक सुरु झालेल्या या गोळीबारामुळे अनेकांना पळण्याची देखील संधी मिळाली नाही.

रिपोर्टनुसार, इस्लामिक स्टेट म्हणजे आयएसआयएसच्या दहशतवाद्यांनी पूर्व सीरियामध्ये हा हल्ला केला आहे. गावकरी काही फळं (ट्रफल्स) गोळा करत होते. या फळांची किंमत जास्त असते. सीरियामध्ये सध्या संघर्षाची स्थिती आहे. त्यामुळे अनेक लोक ट्रफल्स गोळा करण्यासाठी बाहेर पडत असतात.

५० लोकांचे अपहरण केलेले असण्याची शक्यता

ब्रिटनमध्ये असलेल्या सीरियन ऑब्जर्वेटरी फॉर ह्युमन्स राईट्सने यासंदर्भात माहिती दिली आहे. जवळपास ५० लोक बेपत्ता आहेत. त्यामुळे आयएसने त्यांचे अपहरण केले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दाव्यानुसार, मृतांमध्ये सरकार समर्थक राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या चार सदस्यांचा देखील समावेश आहे.

स्थानिक माध्यमानुसार आकडा जास्त

सरकारी मीडिया न्यूज दामा पोस्टनुसार, मृतांची संख्या ४४ आहे. दामा पोस्टने दावा केलाय की, इस्लामिक स्टेट दहशतवादी संघटनेने केलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे. हल्ला इराकच्या सीमेजवळ पूर्व प्रांत दीर अल-जौरच्या कोबाजेब शहरातील वाळवंटात झाला आहे.

सीरियाची परिस्थिती काय?

सीरिया हा दहशतवादाने पिडलेला देश आहे. देशात गरीबीने उच्चांक गाठला आहे. याठिकाणी अमेरिका आणि इस्राइल मोठ्या प्रमाणात हल्ले करत असते. त्यामुळे या देशाची बिकट अवस्था आहे. ९० टक्क्यांपेक्षा अधिक लोक गरिबी रेषेच्या खाली असल्याचं सांगितलं जातं. मागील वर्षी देशात मोठा भूकंप आला होता. तेव्हापासून तर देश अधिक तळाला गेला आहे. (Latest Marathi News)

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close