क्राइम

15  लाखांची खंडणी मागणाऱ्या पोलीस शिपायावर गुन्हा दाखल 

Spread the love

 पुणे / नवप्रहार मीडिया

                 सासऱ्याचा खून करतानाचा व्हिडीओ माझ्या जवळ आहे. त्या प्रकरणात मी तुमच्या कुटुंबाला अडकवू शकतो अशी धमकी देत 15 लाखांची खंडणी मागणाऱ्या शिपायावर तक्रारी नंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी सुद्धा या प्रकरणातील आरोपी राकेश भंडारी याच्या कडून शिपाई सागर गोविंद शिंदे याने 8 लाख रुपये उकळले असल्याचे राकेश भंडारी याने तक्रारीत म्हटले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, 27 मार्च 2022 रोजी वरवंड येथील राहुल भंडारी  यांचे सासरे
सुरेश गंधी यांचा गळा आवळून वन विभागाच्या जागेत खून करण्यात आला होता. हा खून करतानाचा व्हिडीओ माझ्याकडे असून या प्रकरणात तुमच्या घरातील सर्वांना अडकवू शकतो. असे सांगत सागर शिंदे याने 15 लाख रुपयांची मागणी आरोपी राकेश भंडारी याच्याकडे केली.

 सुरेश गांधी या ज्येष्ठ नागरिकाचा वन विभागाच्या हद्दीत गळा दाबून खून करतानाचा व्हिडीओ आपल्याकडे आहे. हे प्रकरण कोणाला न सांगण्यासाठी मला 15 लाख रुपये द्या, अशी मागणी करणाऱ्या पुणे शहर पोलीस दलात असलेल्या पोलिसावर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, सागर शिंदे याने आरोपी राकेश भंडारी याच्याकडून यापूर्वी आठ लाख रुपये घेतले आहेत.
त्यामुळे राहुल भंडारी यांनी यवत पोलीस ठाण्यात सागर शिंदे याच्या विरोधात तक्रार दिली.
या तक्रारीवरुन यवत पोलिसांनी सागर शिंदे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे   यांच्या मार्गदर्शनाखाली  सहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे करीत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close