खेळ व क्रीडा
खेलो मास्टर्स क्रीडा स्पर्धेत वरूड च्या खात्यात 14पदक
अमरावती जिल्ह्याला मिळाली ऐकून 26 पदक

वरुड / प्रतिनिधी
अमरावती येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय खेलो मास्टर्स क्रीडा स्पर्धेत अमरावती जिल्ह्याच्या खात्यात 26 पदक आले आहेत त्यापैकी 14 पदक वरूड शहराच्या खेळाडूंनी पटकावले आहे. यात ऐकून ,650 स्पर्धक सहभागी झाले होते.
सहकार महर्षी पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 125 व्या जयंती निमित्त अमरावती येथे राज्यस्तरीय खेलो मास्टर्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात वरुडच्या स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. ज्यात वरुडच्या झेन कम्प्युटरचे संचालक विजय मिश्रा यांनी रनिंगमध्ये ४ पदक प्राप्त केले, जेन कोल्ड्रींक चे संचालक प्रवीण जेन यांनी बॅडमिंटनमध्ये २ पदक प्राप्त केले तर ओम कासदेकर यांनी रनिंग मध्ये ४ पदक व पुंडलिक बासुंदे यांनी हि रनिंग मध्ये ४ पदक प्राप्त केले या सर्व वरुडच्या खेळाडुचे मे गोमती जिनिंग इंड्रस्टीजचे संचालक रितेश शाह व वरुड व्यापारी संघाचे अध्यक्ष गिरिधर देशमुख यांनी अभिनंदन केले
या स्पर्धेत वय वर्षे 30 ते 100 वर्ष पर्यंत विविध वयोगटातील पुरुष व महिलांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते पंचवटी चौक स्थित श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, विभागीय क्रीडा संकुल, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यांच्या मैदानावर आयोजित या स्पर्धेमध्ये संपूर्ण राज्यातील 650 स्पर्धकांनी सहभाग घेतला 30 ते 100 वर्ष विविध वयोगटातील पुरुष व महिलांसाठी विविध. स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते पंचवटी चौक स्थित श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, विभागीय क्रीडा संकुल, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यांच्या मैदानावर आयोजित या स्पर्धेमध्ये संपूर्ण राज्यातील 650 स्पर्धकांनी सहभाग घेतला 30 ते 100 वर्ष विविध वयोगटातील पुरुष व महिलांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये कुस्ती, रायफल शूटिंग, हॉकी, फुटबॉल, शूटिंग बॉल ,खो-खो, टेबल टेनिस, जलतरण, कबड्डी, रनिंग ,बॅडमिंटन, अशा खेळांचा समावेश होता यावेळी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, निर्मलाताई देशमुख, आमदार सुलभाताई खोडके, दिलीप इंगोले, दिलीप कडू, ललित चौधरी, क्रीडा उपसंचालक विजय संतान, साहेबराव वानखडे डॉक्टर अंजली ठाकरे, अजय आळशी, डॉक्टर नितीन चवाळे, महेश अलोणे उपस्थित होते.