कारखेडा येथे तांडा सुधार योजनेअंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन
वाशिम /प्रतिनिधी
दिनांक १६ मार्च २०२४ रोजी मा. ना. संजयभाऊ राठोड, पालकमंत्री, वाशिम यांच्या पुढाकारातून तांडा सुधार योजनेअंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. महेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य सौ. शोभाताई सुरेशराव गावंडे त्यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे आयोजन सरपंच सौ. सोनालीताई बबनराव सोळंके, उपसरपंच श्री. अनिल सितारामजी काजळे, आणि ग्रा. पं. सदस्य तथा गावकरी मंडळी कारखेडा उपस्थित होते.या कार्यक्रमात बोलताना डॉ. महेश चव्हाण यांनी तांडा सुधार योजनेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी म्हटले की, ही योजना ग्रामीण भागातील लोकांना चांगल्या रस्त्यांची सुविधा प्रदान करते आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत करते.
या कार्यक्रमाप्रसंगी, तांडा सुधार योजनेअंतर्गत बांधकाम करण्यात येणाऱ्या रस्त्याची माहिती देण्यात आली. या योजनेअंतर्गत, कारखेडा येथे १५ लाख रुपये खर्चून सिमेंट काँक्रीट रस्ता बांधण्यात येणार आहे.
या कार्यक्रमानंतर, तांडा सुधार योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.
डॉ. महेश चव्हाण यांच्या प्रयत्नाने कारखेडा गावांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल गावचे पोलीस पाटील वासुदेव सोनोने यांनी डॉ. महेश चव्हाण यांचे आभार मानले.
उपस्थितमध्ये योगेंद्र सोळंके अध्यक्ष श्री शंकरगिरी संस्थान, उपाध्यक्ष प्रभाकरराव भोयर देवराव पिंगाने अध्यक्ष सेवा सहकारी सोसायटी कारखेडा राजेंद्र हरिचंद्र म्हात्रे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती कारखेडा
नेहमीचंद राठोड सरपंच सेवादासनगर बबनराव देशमुख ,गणेश जाधव, बाळू जाधव, मनोज तायडे, राजु चव्हाण हे सर्व ग्रामपंचायत सदस्य.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वासुदेव सोनोने पोलीस पाटील कारखेडा यांनी केले.