दुष्यंत चे दुष्कृत्य ; कुटुंबाला संपवले , 13 वर्षाचा मुलगा बचावला

यानंतर स्वतःही केली आत्महत्या
कुरुक्षेत्र ( हरियाणा ) / नवप्रहार डेस्क
हरियाणा राज्यातील कुरुक्षेत्र येथील आरा गावातून एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना उघडकीस आली आहे. येथे एका 38 वर्षीय तरुणाने कुटुंबाला संपविले आहे. दुष्यंत (38) असे या घटनेतील आरोपीचे नाव असून तो शाहाबाद कोर्टात कामाला होता.आरोपीने मुलाला मारण्याचाही प्रयत्न केला, मात्र तो बचावला.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यारा गावातील पैशाच्या व्यवहाराला कंटाळून दुष्यंतला हे पाऊल उचलावे लागले. आरोपीने आधी वडिलांना बेशुद्ध केले आणि नंतर गळा आवळून खून केला. तसेच पत्नी आणि आईला विष पाजून बेशुद्ध केले व नंतर गळा दाबून त्यांना संपवलं. त्यानंतर आरोपीने स्वतः विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली.
खून करताना मुलाने आरोपीला पाहिले होते. यामुळे घाबरून त्याने आपल्या 13 वर्षाच्या मुलाला विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुटुंबीयांनी वेळीच मुलाला वाचवले. त्यांना बाशाबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सामान्य असल्याचे सांगण्यात येत आहे.
तपासादरम्यान पोलिसांना घटनास्थळावरून सुसाईड नोटही जप्त करण्यात आली आहे. नोटेत पैशांच्या व्यवहाराचा उल्लेख होता. यामुळे दुष्यंत मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दुष्यंतने वडिलांना बेशुद्ध केले आणि त्यांच्यावर वाळू ओतली. पोलिसांनी नायब सिंग (55), त्यांची पत्नी अमृत कौर (50), अमनप्रीत (35) आणि आरोपी दुष्यंत (38) यांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले.
सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे की, दुष्यंतला त्याचे कुटुंबीय सोनिपत येथे राहणाऱ्या पैशाच्या व्यवहारासाठी त्रास देत होते. यामध्ये दोन पोलिसांचाही समावेश आहे. याला कंटाळून दुष्यंतने खळबळजनक घटना केली. साहिलच्या तक्रारीवरून पोलिसांनी कोमल, विक्रम, संदीप, चंद्रभान, सलिंद्र, धनपत सिंग आणि पोलीस कर्मचारी रोहित आणि शिव मुनी यांची या प्रकरणात नावे घेतली आहेत.