विदेश

गॅस स्टेशन मध्ये आग 12 लोकांचा मृत्यू तर 60 जखमी 

Spread the love

रशिया / नवप्रहार वृत्तसेवा 

              राशियातून एक मोठी बातमी समोर येत आहे.येथील दागेस्तानी  शहरातील एका गॅस स्टेशन मध्ये लागलेल्या आगीत 12 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 60 लोक जखणी झाले आहेत. मृत्युमुखी पडलेल्या लोकांमध्ये 2 मुलांचा देखील समावेश आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, आग महामार्गावरील एका ऑटो रिपेअररिंगच्या दुकानात लागली होती. येथे एक स्फोट झाल्याने ही आग पाहता पाहता जवळच असलेल्या गॅस स्टेशनपर्यंत पोहोचली. यामुळे गॅस स्टेशन भीषण आगीच्या विळख्यात आले. या आगीत एक, एक मंजली घरही जळून खाक झाले आहे. तसेच या आगीत होरपळून आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 60 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितल्यानुसार, येथे युद्ध जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दागेस्तानीचे गव्हर्नर सर्गेई मेलीकोव्ह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. जखमींमध्ये 13 मुलांचा समावेश आहे. ही आग एवढी भीषण होती की, आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना तब्बल साडेतीन तास लागले. या आगीने जवळपास 600 स्क्वेअर मिटरचा परिसर आपल्या विळख्यात घेतला होता.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close