क्राइम

अनैतीक संबंधाची शंका ; तरुणाची हत्या

Spread the love

भिलवाडा ( राजस्थान) / नवप्रहार डेस्क 

                  शेजारी राहणाऱ्या तरुणासोबत चा फोटो महिलेने आपल्या पतीला दाखवला. त्यावरून दोघात भांडण झाले. आणि पतीने पत्नीला माहेरी पाठवून दिले. तरुणामुळे मुलीला माहेरी यावे लागल्याने महिलेच्या माहेरची मंडळी संतापली होती. त्यांनी तरुणाचे अपहरण करून त्याची हत्या केली. व मृतदेह झाडाला लाटकवला. मुलगा बेपत्ता असल्याने तरुणाच्या घरच्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यात ही घटना घडली. याप्रकरणी राजस्थान पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार  काही दिवसांपूर्वी राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यात राहणाऱ्या एका महिलेने शेजारी राहणाऱ्या एका तरुणाबरोबरचा फोटो तिच्या पतीला दाखवला होता. त्यानंतर दोघांमध्येही वाद सुरू झाला. वाद इतका विकोपाला गेला की महिलेच्या पतीने तिला घरातून बाहेर काढत माहेरी जाण्यास सांगितले.

मृतक तरुणामुळे आपल्या मुलीला माहेरी यावं लागलं या रागातून महिलेच्या माहेर लोकांनी शुक्रवारी या तरुणांचे अपहरण केले. तसेच त्याची हत्या करत मृतदेह गावातील शाळेच्या प्रांगणातील एका झाडाला लटकवला. तरुणांचे अपहरण झाल्यानंतर त्याच्या घरच्यांनी त्याचा शोध सुरू केला. मात्र, त्याचा मृतदेह शाळेच्या प्रांगणातील झाडावर लटकला असल्याचे दिसून आले.

या घटनेनंतर तरुणांच्या घरच्यांनी तसेच काही ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यासमोर धरणा प्रदर्शन सुरु केले. जोपर्यंत आरोपीला पकडलं जात नाही आणि मृतक तरुणाच्या परिवाराला आर्थिक मदत दिली जात नाही. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, ग्रामस्थांचा वाढता रोष बघता राजस्थान पोलिसांनी महिलेच्या माहेरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केला.

यासंदर्भात मृतक तरुणाचे काकांनी प्रतिक्रिया दिली. माझ्या पुतण्याचे गावातील महिलेशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून त्याची हत्या करण्यात आली आहे. यापूर्वीसुद्धा महिलेच्या घरच्यांनी त्याला मारहाण केली होती. हे प्रकरण ग्राम पंचायतमध्येदेखील पोहोचलं होतं. मात्र, त्यानंतरही त्याला सातत्याने धमकी दिली जात होती. आता तर त्याची हत्या करण्यात आली आहे, असे ते म्हणाले. तसेच आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close