शालेय क्रीडा महोत्सवात शिवाजी शाळेला घवघवीत यश..
मोर्शी / प्रतिनिधी
डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सवी वर्षानिमित्त श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा आयोजित शालेय क्रीडा महोत्सव 2024 अंतर्गत मोर्शी प्रभाग शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन अण्णासाहेब कानफाडे स्मृती विद्यालय मोर्शी येथे आयोजित करण्यात आल्या होत्या यामध्ये शिवाजी उच्च माध्यमिक शाळा मोर्शी ने उत्कृष्ट अशी कामगिरी करत प्रभागांमध्ये चॅम्पियनशिप प्राप्त केली
1. *व्हॉलीबॉल मुले वर्ग 8ते10 विजयी*
2.*व्हॉलीबॉल मुली वर्ग 8 ते 10 विजयी*
3. *कबड्डी मुले 8ते 10 विजयी*
4.*कबड्डी मुली वर्ग 8 ते 10 विजयी*
5. *खो खो मुले वर्ग 5 ते 7 विजयी*
6.*कबड्डी मुली वर्ग 5 ते 7 विजयी*
*7 कबड्डी मुले वर्ग 5 ते 7 विजयी*
तसेच *मैदानी स्पर्धेमध्ये*
1. *100मीटर धावणे मुले प्रथम व द्वितीय*
2. *400 मीटर धावणे मुले प्रथम व द्वितीय*
3. *गोळा फेक मुले प्रथम*
4. *गोळा फेक मुली प्रथम*
5. *लांब उडी मुले द्वितीय*
6. *लांब उडी मुली द्वितीय* ……. विद्यार्थ्यांच्या या अतुलनीय कामगिरीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक एस आर देशमुख शाळा तपासणी अधिकारी निळकंठ यावले उपमुख्याध्यापक आर एच जावरकर पर्यवेक्षक यु एम गिद एम बी ढाकुलकर तसेच क्रीडा शिक्षक विजय तारापुरे अजय हिवसे राजेश मुंगसे अतुल वैद्य प्रतीक उगले अभी देशमुख सुमित डेहनकर आदींनी अभिनंदन केले