शेतकऱ्यांनसह शिवसेनेची विज वितरण कंपनीच्या कार्यालयात धडक
कृषी पंपाचा सुरळीत विज पुरवठा करण्याची मागणी
नांदगाव खंडेश्वर/ प्रतिनिधी
रब्बी हंगामाला सुरवात झाली असून विज वितरण कंपनीच्या नाकर्तेपणा मुळे कृषी पंपाचा विज पुरवठा सुरळीत होत नसल्याने शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात विज वितरण कंपनीच्या कार्यालयात धडक देऊन सुरळीत विज पुरवठा करावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला
रब्बी हंगामाच्या गहू चना पीक पेरणीला सुरवात झाली असून शेतात मुबलक पाणी असताना सुद्धा विजेच्या अनियमित पुरावठ्या मुळे पिकाला पाणी देऊ शकत नाही आठवड्यातुन दिवसाला तीन दिवस होणारा आठ तास होणारा विज पुरवठा सुद्धा सुरळीत होत नाही कधी ओहरलोड मुळे मोटारी चालत नाही तर कधी होलटेज मिळत नाही आधीच अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून मुबलक पाण्यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारा मुळे पाण्या अभावी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनि शिवसेनेच्या नेतृत्वात विज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता पिंगे यांना घेराव करून निवेदन सादर केले यावेळी प्रकाश मारोटकर उपजिल्हप्रमुख बाळासाहेब राणे माजी तालुका प्रमुख विष्णू तिरमारे उपातालुका प्रमुख दिलीप देवतळे बाजार समितीचे संचालक विजय अजबले शहर प्रमुख निलेश इखार माजी सरपंच मधुकर कोठाळे अमोल दांडगे मनदेव चव्हाण अक्षय राणे गुणवंत चांदूरकर सुरज सोळंके रत्नाकर खेडकर रवी ठाकूर शिवचरण ब्रह्मणवाडे भागवत लाहे विजय पेटले पवन पुसदकर आशिष हटवार भुमेश्वर गोरे ज्ञानेश्वर लांजेवार शुभम रावेकर शुभम सावरकर वासुदेव लोखंडे गजानन पोफळे लिलाधर चौधरी निलकमल मारोटकर अक्षय हिवराळे इत्यादी शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते