शाशकीय

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणुक यंत्रणा सज्ज!

Spread the love

शहरातील सर्व मतदान केंद्रातील मतदारांना घरपोच मिळत आहेत व्होटरस्लिप!

अरविंद वानखेडे
यवतमाळ

लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांना आपले मतदान केंद्राची माहिती होण्यासाठी तसेच मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोग यांच्याकडून केंद्रनिहाय बूथ लेवल अधिकारी यांच्यामार्फत वोटर स्लिप वाटप संपूर्ण शहरांमध्ये सुरू आहे. यवतमाळ शहरात हा उपक्रम राबविण्यासाठी जिल्हाधिकारी यवतमाळ आपल्या यंत्रणेद्वारे कसोशीने प्रयत्न करत आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणूक अधिकारी गोपाल देशपांडे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, तहसीलदार योगेश देशमुख शहरामध्ये जास्तीत जास्त वोटर स्लिप वाटप करता येईल यासाठी प्रयत्न करीत आहेत.
शहरातील 248 मतदान केंद्रांवरील बूथ लेवल अधिकारी यांच्याकडे शासनाकडून 204382 वोटर स्लिप प्राप्त झाल्या आहेत. सदर वोटर स्लिप योग्य रीतीने वाटप व्हावे यासाठी नगरपरिषद महिला बचत गटांची मदत घेतली जात असून त्यासाठी 195 महिलांची मदतनीस म्हणून नेमणूक केली आहे.
सदर काम योग्य रीतीने पार पाडले जात आहे की नाही योग्य मतदाराला त्याची मतदार स्लिप मिळाली की नाही ही खात्री करण्यासाठी नगरपरिषदेच्या शिक्षण विभाग व इतर विभागाचे 25 सुपरवायझर व तीन नियंत्रक अधिकारी काम करीत आहेत.
दिनांक 23 एप्रिल 2024 पर्यंत 74% वोटर स्लिप वाटून झाल्या आहेत. या वोटर स्लिप मध्ये मतदाराचे नाव, यादीचा भाग क्रमांक, मतदाराचा अनुक्रमांक, मतदाराचा ओळखपत्र क्रमांक, मतदान केंद्राचे नाव व त्याचा पत्ता गुगल मॅप च्या माहितीसह देण्यात आलेला आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्र शोधण्यासाठी मतदारांना मदत होऊन वेळेची बचत होणार आहे, या माध्यमातून मतदानाची
टक्केवारी वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
ज्या मतदारांना वोटर स्लिप प्राप्त झाली नसेल त्यांनी आपल्या केंद्रप्रमुखाकडे संपर्क करून मतदार केंद्र क्रमांक प्राप्त करून घ्यावा, आपले मतदान केंद्र माहित नसल्यास मतदार https://electoralsearch.eci.gov.in/pollingstation या लिंक वरुन प्राप्त करून घेऊ शकतात. मतदारांनी या सुविधेचा फायदा घेऊन जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
————————————————————–

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close