खेळ व क्रीडा

 दुसऱ्या डावात शतक ठोकत जो रुट ने अनेक विक्रमाना घातली गवसणी 

Spread the love

लॉर्ड (इंग्लंड) /  नवप्रहार क्रीडा प्रतिनिधी

                    इंग्लंडचा फलंदाज आणि सध्या जबरदस्त फॉर्मात असलेल्या जो रूट ने श्रीलंका सोबत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावातही शतक ठोकत अनेक विक्रमाना गवसणी घातली आहे. त्याने पहिल्या डावातही १४१ धावा ठोकत शतक झळकावले होते. दुसऱ्या डावात देखील त्याने १०३ धावा केल्या आहेत. या खेळीने त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

या सामन्यात इंग्लंडचा दुसरा डाव ५४.३ षटकात २५१ धावांवर संपुष्टात आला. या डावात रुटने दमदार खेळ करताना १२१ चेंडूत १०३ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने १० चौकार ठोकले. त्याने ११ चेंडूतच त्याचे शतक पूर्ण केले होते.

त्याला लहिरु कुमाराने कामिंडू मेंडिसच्या हातून झेलबाद केले. त्याच्या विकेटसह इंग्लंडचा डावही संपला. इंग्लंडने पहिल्या डावात २३१ धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळे दुसऱ्या डावातील २५१ धावांवर आता त्यांनी श्रीलंकेसमोर विजयासाठी ४८३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे

जो रुटचे विक्रम

जो रुटचे हे त्याच्या कारकिर्दीतील चेंडूंच्या तुलनेतील सर्वात जलद शतक ठरले आहे. यापूर्वी त्याने २०२२ मध्ये नॉटिंगघमला न्यूझीलंडविरुद्ध ११६ चेंडूत शतक केले होते.

तसेच त्याचे हे कारकिर्दीतील ३४ वे कसोटी शतक आहे. त्यामुळे तो आता इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी शतके करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने दिग्गज ऍलिस्टर कूकला मागे टाकले आहे. कूकने ३३ शतके इंग्लंडसाठी केली आहेत, तर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर २३ शतकांसह केविन पीटरसन आहे.

याशिवाय रुट आता सर्वाधिक कसोटी शतके करणाऱ्या जगातील एकूण खेळाडूंमध्ये सहाव्या क्रमांकावर आला असून सुनील गावसकर, ब्रायन लारा, माहेला जयवर्धने आणि युनूस खान यांची त्याने बरोबरी केली आहे. या चौघांच्या नावावरही कसोटीत ३४ शतकांची नोंद आहे.

सर्वाधिक कसोटी शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर ५१ शतकांसह सचिन तेंडुलकर आहे. त्यापाठोपाठ जॅक कॅलिस (४५), रिकी पाँटिंग (४१), कुमार संगकारा (३८) आणि राहुल द्रविड (३६) आहेत.

 

 

लॉर्ड्सवरही कमालीचा खेळ

जो रुटने लॉर्ड्सवर कसोटीमध्ये शतक करण्याची ही सातवी वेळ आहे. त्यामुळे तो लॉर्ड्सवर सर्वाधिक कसोटी शतके करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने ग्रॅहम गुच आणि मायकल वॉन यांना मागे टाकले आहे. गुच आणि वॉन यांनी लॉर्ड्सवर प्रत्येकी ६ शतके केली आहेत. तसेच केविन पीटरसन आणि अँड्र्यूज स्ट्रॉस यांच्या नावावर प्रत्येकी ५ शतके आहेत.

इतकेच नाही, तर जो रुट लॉर्ड्सवर कसोटीत सर्वाधिक धावा करणाराही खेळाडू ठरला आहे. त्याने गुच यांनाच याबाबत मागे टाकले आहे. रुटचे आता लॉर्ड्सवर २२ कसोटीत २०२२ धावा झाल्या आहेत.

या विक्रमाच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या गुच यांचे २१ सामन्यांत २०१५ धावा आहेत. लॉर्ड्सवर रूट आणि गुच यांनाच २००० हून अधिक कसोटी धावा करता आल्या आहेत. त्यांच्यापाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऍलिस्टर कूकच्या २६ कसोटीत १९३७ धावा आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close