दिवसाढवळ्या 10 मिनिटात 10 कोटीची लूट

बंदुकीच्या धाकावर केली लूट
डेहराडून / नवप्रहार मीडिया
देशात दिवाळी चा सन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिवाळीत लोक सोन खरेदी करण शुभ समजतात. यावेळी बाजारात खूप गर्दी असते. अश्या गर्दीत देखील लुटारूंनी दिवसाढवळ्या सिण्या – चांदीच्या दुकानातून 10कोटी रुपयाचे दागिने लुटल्याची खळबळजनक घटना उत्तराखंडच्या राजधानीत घडला आहे.
उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये हा चोरीचा प्रकार घडला आहे. ज्वेलरी शोरूमचे कर्मचारी नेहमीप्रमाणे कामात व्यग्र होते. डिस्प्लेमध्ये एक एक करून मोठमोठे दागिने सजवून ठेवण्यात आले होते. सणासुदीचा काळ असल्याने शोरूम दागिन्यांनी भरलं होतं; पण ग्राहकांऐवजी दरोडेखोरांनीच हे दागिने लुटले.
डेहराडूनमध्ये 10 मिनिटांत 10 कोटींची लूट
राजपूर रोड, डेहराडून इथे रिलायन्सचं ज्वेलरी शोरूम आहे. या गजबजलेल्या बाजारात 11 वाजेपर्यंत ग्राहक येतात आणि त्यामुळे शोरूम 10 वाजेपर्यंत सुरू होतात. 9 नोव्हेंबरलाही हेच झालं. 10 वाजता शोरूम उघडल्यानंतर कर्मचारी आपापल्या कामात व्यग्र होते. तेवढ्यात चार जण या ज्वेलरी शोरूममध्ये आले. कदाचित ग्राहक असतील असं कर्मचाऱ्यांना वाटलं. त्यांनी त्यांचं स्वागत केल्यावर ते शोरूममध्ये आले.
तोपर्यंत सगळं काही सुरळीत होतं; मात्र त्यानंतर चार दरोडेखोरांपैकी एकाने खिशातून पिस्तूल काढून थेट सुरक्षारक्षकाच्या कानावर ठेवलं. हे पाहून सगळे घाबरले. कोणाला काही समजण्यापूर्वीच समोरच्या व्यक्तीनेही आपली बंदूक काढून एका कर्मचाऱ्याच्या कानाला लावली आणि सर्वांना गप्प राहण्याची धमकी दिली. काही वेळातच ज्वेलरी शोरूमचं दृश्य पूर्णपणे बदललं होतं. ते पाहून सगळे घाबरले होते.
10 मिनिटांत बंदुकीच्या धाकावर लुटले 10 कोटींचे दागिने
या चौघांजवळ वायर होत्या. त्यांनी तात्काळ शोरूममध्ये उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांचे हात त्या वायरने पाठीमागे बांधले. शोरूममध्ये काम करणाऱ्या तीन महिला कर्मचारी वगळता इतर सर्वांचे हात बांधलेले होते. आपला धाक दाखवण्यासाठी त्यांनी सुरक्षारक्षकालाही मारहाण केली. दोन हल्लेखोरांच्या हातात पिस्तूल होतं. चौघांनीही पटकन शोरूममध्ये असलेले दागिने गोळा केले, सर्व दागिने बॅगेत ठेवले आणि अवघ्या 10 मिनिटांत दुकानातून पळ काढला.
राज्य स्थापना दिनानिमित्त बंदोबस्तावर होते पोलीस
चौघेही कारमधून आले होते आणि त्यांच्याकडे शस्त्रं होती. ते शोरूममध्ये फक्त 10 मिनिटं थांबलं; मात्र तेवढ्यात त्यांनी 10 कोटींहून अधिक रुपयांचे दागिने पळवले. हे हल्लेखोर निघून गेल्यावर कर्मचाऱ्यांनी संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून संपूर्ण घटनेची माहिती घेतली. ही घटना 9 नोव्हेंबर रोजी घडली आणि या दिवशी राज्याचा स्थापना दिवस साजरा केला जातो. राज्य स्थापना दिनानिमित्त संपूर्ण पोलीस खातं सुरक्षा व्यवस्थेत गुंतलं होतं आणि हीच संधी दरोडेखोरांनी साधून दागिने लंपास केले.