राजकिय

 काँग्रेस चे चार ते पाच आमदार दादांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर 

Spread the love

मुंबई / विशेष प्रतिनिधी

                     येणाऱ्या काही दिवसात राजकारणात मोठा भूकंप होणार असून काँग्रेस चे चार ते पाच आमदार आमच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी दिली आहे.

रविवारी अमरावतीच्या काँग्रेस आमदार सुलभा खोडके अमरावतीत एका मेळाव्यात अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचे मिटकरी म्हणाले. आज राष्ट्रवादीतील इनकमिंगची सुरूवात सिने अभिनेते सयाजी शिंदेपासून सुरू झाल्याचं मिटकरी म्हणाले.

अमोल मिटकरी उद्या अकोल्यात प्रकाश आंबेडकरांची भेट घेणार

दरम्यान, आमदार अमोल मिटकरी उद्या अकोल्यात प्रकाश आंबेडकरांची भेट घेणार आहेत. अकोल्यातील ‘यशवंत भवन’ या आंबेडकरांच्या निवासस्थानी आमदार मिटकरी आंबेडकरांची भेट घेणार आहेत. अजित पवार आणि प्रकाश आंबेडकरांनी आगामी विधानसभा निवडणुकीत एकत्र यावं, अशी साद आमदार अमोल मिटकरींनी दिली आहे. आंबेडकरांच्या काही अटीशर्ती असतील तर आपण मध्यस्थी म्हणून काम करू असेही ते म्हणालेत. या संदर्भातच आज रात्री अजितदादांसोबत आपण स्वतः बोलणार असल्याचंही मिटकरी म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणेंच्या तोंडाला पट्टा लावावा

नितेश राणे या व्यक्तीबद्दल बोलावं वाटत नाही. प्रत्येक तरुण सुशिक्षित झालाय, अशा बावळट लोकांच्या नादाला लागणार नाही असे अमोल मिटकरी म्हणाले. नितेश राणेंचे वक्तव्य कोणीही लोकशाहीमध्ये खपवून घेणार नाही. त्यांना आवरलं नाही तर त्यांच्याच पक्षांना नुकसान भोगावे लागेल. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या तोंडाला पट्टा लावावा असेही मिटकरी म्हणाले. अशा प्रकारचे वक्तव्य करून जातीय दंगल भडकवण्याचं पाप नितेश राणेंनी करू नये, असा सल्ला मिटकरींनी दिला.

पक्ष प्रवेश करणाऱ्या सर्वांची नावं माहिती आहेत, पण सध्या घेणार नाही

अभिनेते सयाजी शिंदे यांच्या पक्षप्रवेशापासून सुरुवात झाली आहे.. लवकरच अमरावती काँग्रेस आमदार सुलभाताई खोडके यांचा पक्षप्रवेश होणार आहे. त्यापुढेही काँग्रेसचे तीन आमदार लवकरच पक्ष प्रवेश करणार आहेत. सर्वांची नावं माहिती आहेत, पण सध्या घेणार नाही असे मिटकरी म्हणाले.
तुतारी गटात बंपर पक्षप्रवेश सुरू आहे याबाबत बोलताना मिटकरी म्हणाले की, त्यातले लोक कंटाळलेत. ते सुद्धा पुढं अजितदादांचं नेतृत्व करताना दिसले तर नवल वाटून घेऊ नका असे मिटकरी म्हणाले. अजितदादांवर विश्वास ठेवून अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची माहिती अमोल मिटकरी यांनी दिली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close