सामाजिक

निस्वार्थ फाउंडेशन ठरत आहे रुग्णांसाठी नवसंजीवनी

Spread the love

 

पांढरकवडा येथील फाउंडेशन च्या  रक्तदात्यांनी वाचविले अनेक रुग्णाचे प्राण.
यवतमाळ / अरविंद वानखडे

रक्त मनुष्याची जीवनदायिनी आहे. त्याच साठी ‘ रक्त दान श्रेष्ठ दान ‘ असे म्हटल्या गेले आहे. पण वेळोवेळी जागरूकता आणून देखील रक्तदानाचे महत्व जनतेला अध्यापही पाहिजे त्या प्रमाणात पटलेले नाही.अश्या स्थितीत पांढरकवडा येथील निस्वार्थ फाउंडेशन ची टीम निस्वार्थ पणे रक्तदान करून अनेक रुग्णांना नवसंजीवनी देत आहे.

यवतमाळ  जिल्ह्याचे ठिकाण असल्याने आणि येथे शासकीय महाविध्यालय आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक  रुग्ण श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये  उपचार घेण्यासाठी येतात. रुग्णांना रक्ताची गरज भासल्यास  रुग्णाचे नातेवाईक रक्ता(ब्लड) करिता निस्वार्थ फाउंडेशन कडे येतात. असेच एक रुग्णाचे नातेवाईकांना डॉक्टरांनी रक्त विकत आणण्याची सूचना केली. मात्र आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने ते रक्त विकत आणू शकत नाही. त्या रुग्णाचा जीव धोक्यात येऊ नये याकरिता नि:स्वार्थ फाउंडेशन ने पांढरकवडा येथील सामाजिक कार्यकर्ते सोनू पुरी यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी रक्ताची उपलब्धता करून दिली.

अनेक व्याधीने ग्रासलेल्या रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासते बाहेरगाहून आलेल्या आणि आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या लोकांना रक्तकरिता भटकावे लागते. यावेळी निस्वार्थ फाउंडेशन अनेक रुग्णांची रक्तकरिता होणारी भटकती थांबवितात. मात्र रक्त अनेकदा उपलब्ध नसल्याने त्यांना सुद्धा अनेक अडचणीचा सामना करावा लागतो.
असाच एक प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सोनू पुरी राहणार पांढरकवडा यांना निस्वार्थ फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी फोन केला जिल्हा रुग्णालय मध्ये रक्ताची आवश्यकता आहे. त्यांना फोन द्वारे कल्पना दिली क्षणाचाही विलंब न करता तब्बल १३ रक्तदात्यांना स्वखर्चाने गाडी करून यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयामध्ये रक्त देण्या करीता आणले. त्यामुळे अनेक रुग्णांना या रक्ताचा फायदा झाला.अनेक रुग्णांचे प्राण वाचविण्यात आले. सोनू पुरी व त्यांच्या टीमने केलेले हे काम कौतुकास पात्र आहे. त्यामुळे सलीमभाई खेतनी फाउंडेशन व नि:स्वार्थ सेवा फाउंडेशन यवतमाळ तर्फे त्यांचे सर्वांनी आभार मानले तसेच नागरिकांना आवाहन करण्यात आले की अशाप्रकारे रक्ताची आवश्यकता भासल्या पुढील क्रमांकावर ती संपर्क करावा संपर्क क्रमांक पुढील प्रमाणे.
१)८६००२८८७८८
२)८९९९७३१२९९
३)९३२५७०८९७४
या प्रसंगी जिल्यातील रक्तदात्यांना आवाहन करण्यात येते की स्वतःहून जिल्हा रुग्णालयातील ब्लड बँक मध्ये रक्तदान करावे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close