Uncategorized

हृदयविकाराच्या झटक्याने पोलिसाचा मृत्यू

Spread the love

 

राजेश सोनुने पुसद तालुका प्रतिनिधी

पोलीस स्टेशन दिग्रस येथे पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असलेले दिपक रामदास ढगे वय 40 वर्ष यांचे दि. 3/8/2023 ला हृदयविकाराच्या झटक्याने पुसद येथील मेडिकल हॉस्पिटल मध्ये निधन झाले.
काळी दौ.येथील डाॅ.रामदास ढगे यांचे चिरंजीव दिपक उर्फ मनोज ढगे वय वर्ष 40 यांना तब्बेत खालावल्याने मेडिकेअर हाॅस्पीटल पुसद येथे दि.2 आंगस्ट पासुन भरती करून उपचार चालु होता, अचानक दि.3 आॅगस्ट ला त्याला हार्ट अॅटॅक येऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला.ते पोलीस स्टेशन दिग्रस येथे कार्यरत होते.चांगला स्वभाव, कोणतेही काम निष्टेने करणे,सर्वांना घेऊन चालणे,हसतमुख व्यक्तीमत्व यामुळै त्यांचे मृत्युने जनसामान्यात हळहळ व्यक्त होत आहे.पुसद उपविभागातील पोलीस विभागात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.त्यांच्या पश्चात त्यांना पत्नी,एक मुलगा,मुलगी व आई वडील असा परिवार आहे. दीपक ढगे यांच्यावर काळी येथील त्यांच्या शेतामध्ये अंत्य संस्कार पार पडले यावेळी माजी शिक्षणाधिकारी रंगराव काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य परसराम डवरे, बिरसा ब्रिगेडचे विदर्भ अध्यक्ष पांडुरंग व्यवहारे, तालुका अध्यक्ष मारोती भस्मे, सामाजिक कार्यकर्ते सुनील टेमकर, दिग्रस व पुसद येथील पोलीस कर्मचारी अधिकारी व नातेवाईकांच्या उपस्थितीत अग्निसंस्कार करून अंत्यविधी पार पडला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close